Goa Dams: ‘साळावली’, ‘अंजुणे’ची होणार दुरुस्‍ती! 58 कोटींचा निधी मंजूर; DPR तयार

Salaulim Anjunem Dam Repair: राज्‍यातील साळावली आणि अंजुणे या दोन धरणांची दुरुस्‍ती करण्‍यात येणार असून केंद्र सरकारने त्‍यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Goa Dam
Anjunem DamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्‍पाअंतर्गत (डीआरआयपी) राज्‍यातील साळावली आणि अंजुणे या दोन धरणांची दुरुस्‍ती करण्‍यात येणार असून केंद्र सरकारने त्‍यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्‍प पुढील दहा वर्षे देशभर राबवण्‍यात येणार असून, या काळात साळावली आणि अंजुणे या दोन धरणांची दुरुस्‍ती कामे हाती घेण्‍यात येणार आहेत..

केंद्रीय जलशक्‍ती राज्‍यमंत्री भूषण चौधरी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तरातून ही माहिती दिली आहे. गोव्‍यासह देशभरातील धरणांच्‍या दुरुस्‍ती कामांसंदर्भात जलशक्‍ती मंत्रालयाने ‘डीआरआयपी’ हा प्रकल्‍प राबवला आहे.

Goa Dam
Anjunem Dam: चारही दरवाजे उघडले, अंजुणे धरणातून विसर्ग सुरू; धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

या प्रकल्‍पाच्‍या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्‍प्‍यात देशभरातील ७३६ धरणांची निवड करण्‍यात आली असून, त्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठी १०,२११ कोटींचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे. यात गोव्‍यातील साळावली आणि अंजुणे या धरणांचा समावेश असून, त्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठी ५८ कोटींचा निधी मंजूर करण्‍यात आला असून, त्‍याबाबतचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवालही (डीपीआर) तयार करण्‍यात आला आहे.

Goa Dam
Salaulim Dam: साळावली भरले! धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सांगे परिसरात पर्यटकांची गर्दी

२०२१ ते २०३१ या दहा वर्षांच्‍या कालावधीत जलशक्‍ती मंत्रालयाकडून हा प्रकल्‍प राबवण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे या दहा वर्षांच्‍या काळात साळावली आणि अंजुणे धरणाची दुरुस्‍ती कामे पूर्ण केली जाणार असल्‍याचे मंत्री चौधरी यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com