Asaduddin Owaisi and Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

'एमआयएम'ची राष्ट्रवादी कॉंग्रेसला युतीची ऑफर

इम्तियाज यांनी कॉंग्रेसला देखील बरोबर येण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते सातत्याने टीका करत असतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सरकार कोसळण्याच्या तारखा दिल्या जातात. सरकारमधील अनेक नेत्यांच्यामागे ईडी आणि आयकर विभागाचे अधिकारी लागले आहेत. परिणामी सत्ताधारी नेत्यांची चिंता वाढली आहे.

भाजपाला (BJP) हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असे एमआयएमचे (AIMIM) इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, इम्तियाज यांनी कॉंग्रेसला (Congress) सुद्धा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही कुणालाही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु”, असं जलील म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT