Kolhapur by election : काँग्रेस विरूध्द भाजप यांच्यात होणार लढत

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजप रिंगणात; शिवसेनेची माघार
Congress & BJP
Congress & BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Kolhapur by election : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होईल की काय अशीच स्थिती स्थानिक पातळीवर झाली होती. मात्र यावर तोडगा निघाला असून कोल्हापूर उत्तरवर आमचाच अधिकार असल्याचे सागणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर माघार घेतली आहे. तर ही जागा काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत आधी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात होते. मात्र आता सेनेच्या माघारीमुळे काँग्रेस विरोद्ध भाजप अशी लढत होईल. तर आमचं ठरलयं म्हणत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही जागा जिंकयाचीच असा संकल्प केला आहे. तर भाजपने ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली असून भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक सत्‍यजित कदम यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित केली आहे. तर ही निवडणूक कोणत्‍याही परिस्‍थितीत बिनविरोध होणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. (Kolhapur North Assembly constituency by-election will be fought between Congress and BJP)

काँग्रेसकडेच दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची (Assembly constituency) जागा रिक्त झाली होती. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा म्हणून पालकमंत्री (Guardian Minister) सतेज पाटील, ग्रामविकास (Rural development) मंत्री हसन मुश्रीफ आग्रही होते. तर माजी आमदार आणि सध्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या जागेसाठी प्रयत्नशिल होते. मात्र आपल्या आपल्या लढण्याने याचा फायदा भाजपला होईल हे जाणून शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला (Congress) सोडण्याचा निर्णय घेतला.

Congress & BJP
Raju Shetti महाविकास आघाडीला राम राम ठोकणार? चंद्रकांतदादांच्या ऑफरनंतर चर्चा

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा ही कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत लढवणार आहेत. त्या शिव शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.

17 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (by-elections) गुरुवारी अधिसूचना निघाली असून दि. 17 पासून उमेदवारी अर्ज (Candidature application) उपलब्ध होतील. तर ते 18 पासून भरण्यास सुरूवात होईल. तर ते जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचा कालावधी मिळणार असून 24 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com