Raju Shetti महाविकास आघाडीला राम राम ठोकणार? चंद्रकांतदादांच्या ऑफरनंतर चर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत?
Raju Shetty
Raju Shettydainik gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागण्याची अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही साथ सोडण्याचे ठरविल्याची चर्चा रंगत आहे. तर याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची चर्चा ही जोरदार रंगली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana will leave Mahavikas Aghadi)

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या या बातमीवर येत्या 5 एप्रिलला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची येत्या 5 एप्रिलला कोल्हापुरात (Kolhapur) एक महत्त्वाची बैठक होणार असून शेट्टी हे आपल्या संघटनेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांशी बोलणार आहेत. त्यानंतर ते आपण या आघाडीत राहायचे की नाही हे ठरवणार आहेत.

दरम्यान राजू शेट्टी (Raju Shetty) यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचारले असता, त्यांनी 'संघटना महाविकास आघाडीवर नाराज आहे, यामध्ये दुमत नाही. ही नाराजी आम्ही वेळोवेळी उघडपणे व्यक्त केली आहे. आघाडीतच राहायचे की बाहेर पडायचे हा धोरणात्मक निर्णय आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Raju Shetty
'मलिकच मंत्री' मात्र बिनखात्याचे

दरम्यान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत शेट्टी यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यावेळी पाटील यांनी, महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे शेट्टी यांच्या लक्षात आल्याचे सांगितले. तसेच महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? राजू शेट्टी पुन्हा भाजपमध्ये (BJP) जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com