well  Twitter
महाराष्ट्र

नवऱ्यासोबत भांडण झालं म्हणून महिलेने स्वतःची 6 मुले फेकली विहिरीत, सर्वांचा मृत्यू

महाराष्ट्रातील महाड परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील महाड परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने पतीवर रागावून स्वत:च्या 6 मुलांना विहिरीत फेकून दिले. यानंतर तिने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांच्या मध्यस्थीमुळे महिलेचा जीव वाचला पण तिच्या 6 मुलांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 3 ते 10 वर्षांच्या दरम्यान सांगण्यात येत असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ही घटना महाड तालुक्यातील धालकाठी येथे घडली. येथे राहणाऱ्या रुना सहानीचे तिच्या पतीसोबत काही गोष्टीवरून भांडण झाले. हे पाहून प्रकरण इतके बिघडले की पत्नी रागाने चिडली आणि तिने आपल्या मुलांना विहिरीत फेकण्यास सुरुवात केली. यानंतर तिने स्वतः विहिरीत उडी घेतली. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी महिलेला बाहेर काढले, मात्र मुलांना बाहेर काढण्यास उशीर झाला होता. शिवराज (3), रोशनी (10), रेश्मा (5), राधा (दीड वर्ष), विद्या (4) आणि करिश्मा (8) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत.

हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे असून कामानिमित्त महाड येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढले. स्थानिक आमदार भरत गोगावले यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT