Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची दादागिरी, जेवणावरुन शिवीगाळ अन् मारहाण; व्हिडिओ व्हायरल!

Maharashtra Crime: महाराष्ट्रातील ठाणे येथे काही लोकांनी दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Maharashtra Crime: महाराष्ट्रातील ठाणे येथे काही लोकांनी दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 3 लोक एका रेस्टॉरंटची तोडफोड करताना आणि हॉटेल मालकाला मारहाण करताना दिसत आहेत.

या लोकांची दादागिरी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. पीडित व्यक्तीने आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान, ओंकार भोसले आणि अभि पाटील अशी आरोपींची नावे आहेत. ठाणे पश्चिमेतील ब्रह्मांडा येथील घोडबंदर रोडवरील आझाद नगर येथील हॉटेल हिल टॉप येथे ही घटना घडली. पीडित व्यक्तीने सांगितले की, बुधवारी रात्री ओंकार भोसले आणि अभि पाटील मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते. इथे दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या शुद्धतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढल्यावर हॉटेल मालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी हॉटेल मालकालाही मारहाण केली. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण सुरु केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हॉटेलची तोडफोडही केली. आरोपींनी (Accused) मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

पोलीस तपासात गुंतले

दुसरीकडे, हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये (Hotel) लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीनुसार ही घटना बुधवारी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान घडली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. यासोबतच पोलीस घटनेचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT