Chandrapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

Chandrapur: पवारांचा हॉल महाराष्ट्रात, किचन तेलंगणात; एक घर दोन राज्यं असलेल्या घराची अजब कहाणी

महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर एक असं गाव आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे.

Pramod Yadav

Maharashtra | Chandrapur: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या जोरदार राजकारण रंगले आहे. तसेच, यावरून केंद्रीय स्तरावर देखील बैठका सुरू आहेत. बुधवारी रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली. दरम्यान, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर एक असं गाव आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे.

(A house in Maharajguda village, Chandrapur is spread b/w Maharashtra & Telangana)

चंद्रपूरच्या महाराजगुडा (Maharajguda village) गावातलं दहा खोल्यांचं हे घर. अजब बाब म्हणजे हे घर चक्क दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे. या घराचा हॉल महाराष्ट्रात, तर किचन चक्क तेलंगणा राज्यात आहे. चंदू पवार आणि उत्तम पवार हे दोघे भाऊ सहकुटुंब सहपरिवार या घरात राहतात.

चंदू पवार आणि उत्तम पवार यांच्या कुटुंबात कसलाही वाद नाही. मात्र हे घर आपल्याच हद्दीत असल्याचा दावा तेलंगणा सरकारही करतं आणि महाराष्ट्र सरकारही. तेलंगणा राज्यानं निश्चित केलेली सीमा या घराच्या बरोबर मधून जात असल्यानं हे घर चर्चेत आलंय. 1969 साली सीमा सर्वेक्षण करण्यात त्यावेळी या घराचा अर्धा भाग महाराष्ट्रात राहिला तर अर्धा भाग तेलंगणात गेला. आम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही. दोन्ही राज्यांना कर आम्ही भरतो. असे उत्तम पवार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT