Mumbai-Goa Highway महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) अपघात  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, एसटी-कारमध्ये झालेल्या धडकेत 3 ठार

पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) झालेल्या अपघातात (Accident) 3 ठार आणि 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अपघाताचे (Accident) सत्र काही केल्या थांबण्याचे चित्र दिसत नाही. या महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) झालेल्या अपघातात 3 ठार आणि 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जखमींना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नक्की कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस वाढत्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना एका जनहित याचिकेनंतर मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कामाच्या ठिकाणी अयोग्य बॅरिकेडिंगमुळे घडणार्‍या अपघातांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे जीवितहानी होत असल्याचा दावा दाखल करण्यात आला होता. तसेच पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे भरून वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देशही हायकोर्टाने अधिकाऱ्यांना दिले होते. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका असलेल्या या महामार्गावर दररोज प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रकल्पातील विलंब तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी 2018 मध्ये दाखल करण्यात आली आहे. यावर हायकोर्टाने NHAI आणि राज्यांना महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले असले तरी, आतापर्यंत याचे काम करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT