Rain News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईसाठी 22 दिवस धोक्याचे! मुसळधार पाऊस झाल्यास अडचणी वाढणार

एकाच वेळी समुद्र भरती आणि मुसळधार पाऊस यामूळे वाढू शकतात अडचणी

दैनिक गोमन्तक

पावसाळा जवळ आला की मुंबईच्या सिमेंटीकरणामूळे मुंबईची तुंबई होण्याला फारसा वेळ लागत नाही. यामुळे नालेसफाई आणि नियोजनावर वेळेत लक्ष घालणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईसह समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात 22 दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामूळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडू शकतात. यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचल्याचा घटना पाहायला मिळतात.

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले कि, जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती 4 जून आणि 3 जुलै रोजी असणार आहे. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. शहराच्या संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT