12th Board Exam Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात बारावीचा पेपर फुटला; खाजगी क्लास चालकाचा हात

याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला केली अटक

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र बोर्ड पेपर लीक: बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला असुन, याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकालाही अटक केली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेत कथित पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. 12th standard paper leaks in Maharashtra; private class owner arrested()

परीक्षा देण्यासाठी परीक्षा (Board Exam) केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आधीच प्रश्नपत्रिका होती. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकालाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी वर्गातील शिक्षकाने 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर व्हॉट्स अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना दिला. मुकेश यादव असे खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खासगी शिक्षकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी हा पेपर आपल्या वर्गातील तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्स अ‍ॅपवर दिल्याचे समोर आले आहे. शनिवारी महाराष्ट्रात (Maharshtra) रसायनशास्त्राचा पेपर झाला. परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये परीक्षेचा पेपर फुटला होता. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शिकवणी शिक्षकाला अटक केली. तो मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात खासगी शिकवणी शिकवत असे आणि त्याच्या बारावीच्या वर्गात सुमारे 15 विद्यार्थी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT