Maharashtra SSC Class 10th Result 2021 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra SSC Class 10th Result 2021: कोकण विभागाचा निकाल 100 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल (10th Result) ऑनलाइन जाहीर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आज, शुक्रवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल (10th Result) ऑनलाइन जाहीर होणार आहे. कोकण विभागाचा दहावींचा निकाल 100 टक्के लागला आहे. (10th result of Konkan division is 100 percent)आणि एकूण महाराष्ट्राचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षण विभागाने घेतला होता. अशा पद्दतीने निकाल जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलआईन पध्दतीने निकाल बघता येणार आहे. दहावीचा विक्रमी निकाल 99.95 टक्के इतका लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालामध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. 99.95 टक्के मुलींचा निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल 99.93 टक्के इतका लागला आहे. पुणे शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. सगळ्यात कमी निकाल नागपूरचा लागला आहे. तर पुणे विभागाचा निकाल 90.45 टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या परिक्षेत 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याचे सांगण्याता आले आहे. 4,922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे.

निकालाबाबतचे सर्व ताजे अपडेट्स तुम्हाला http://result.mh-ssc.ac.in तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर आज, शुक्रवारी दुपारी 1 वाजता मिळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT