कळंगुटमधील खोबरावाडो येथून पाळीव कुत्र्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुत्रा घराबाहेर बसला असता अनोळखी व्यक्तीने त्याचे अपहरण केले, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कुत्रा कोणला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कुत्र्याच्या मालकाने केले आहे.
धुळेर येथील पाईपलाईन दुरस्तीमुळे पर्वरीत दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी पर्वरीत मर्यादीत पाणी पुरवठा होईल. यामुळे नागरिकांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कळंगुटमधून अपहरण झालेला तो कुत्रा अखेर आढळला असून, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन कुत्रा मूळ मालकाकडे सुपूर्द केला आहे. कुत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मालकाने पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
पर्वरी उड्डाणपुलाच्या कामासाठी ०२ जानेवारी २०२६ रोजी ODP बायपास ते दामियान दी गोवा आणि कदंब हॉटेल ते ओकोकेरो जंक्शन दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दुचाकी चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांनी दोघाजणांना अटक करून चोरलेली एक दुचाकी जप्त केली आहे. संतोष यादव ( रा. बिहार) व प्रकाश परियार (रा. बिहार) अशी सशयितांची नावे असून दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आके येथे या चोरट्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पकडले. हल्लीच नावेली, फातोर्डा तसेच नुवे येथून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. यातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्तही झालेल्या आहेत.
राज्यात नाताळ सणाचा उत्साह आहे, देश-विदेशातील अनेक पर्यटक आपले वर्षांची अखेर आणि नवी वर्षांचा आरंभ उत्साहात व्हावा यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी पर्यटनासाठी आणि राज्यातील तापमान सौम्य राखण्यासाठी लाभदायक ठरत आहे. त्यामुळे यंदा वर्ष अखेर कडाक्याच्या थंडीत आनंददायी होणार असल्याची शक्यता असून पुढील चार-पाच दिवस राज्यात किमान तापमान १८ ते १९ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
२५ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या हडफडे येथील 'बिर्च' (Birch) नाईट क्लब अग्निकांड प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल अखेर सरकारला सादर करण्यात आला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा अहवाल तयार केला असून, त्यामध्ये स्थानिक पंचायत आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
उत्तर गोव्यातील प्रसिद्ध वागातोर किनारपट्टीवर असलेल्या 'रोमियो लेन' येथील बेकायदेशीर अतिक्रमणांवर पर्यटन खात्याने कठोर अंमलबजावणी करत कारवाई केली आहे. बऱ्याच काळापासून या भागातील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या, ज्याची दखल घेत विभागाने हे अतिक्रमण हटवले आहे
डिचोलीत मृतावस्थेत आढळलेल्या लक्ष्मी भिकाजी शिरोडकर (वय. 51) या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट. मारहाण आणि नाक दाबल्याने मृत्यू संशयित आरोपी रमेश तेलीने दिली खुनाची कबुली. आरोपीला अटक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.