Goa Live News Dainik Gomantak
Live Updates

Goa News: नेसई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात आग; अग्निशमन दलाकडून 10 लाखांची मालमत्ता वाचवली

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील बातम्या. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल समुद्रकिनाऱ्यावर धक्कादायक प्रकार! 8 ते 10 वर्षांच्या रशियन मुलींना फूलं विकायला लावून क्यूआर कोडने पैसे जमा

हरमल समुद्रकिनाऱ्यावर एक गंभीर आणि त्रासदायक प्रवृत्ती समोर येत आहे. येथील पर्यटकांकडून लहान रशियन मुलींना, ज्यांचे वय केवळ ८ ते १० वर्षांदरम्यान आहे, त्यांना फूल विकायला लावले जात आहे आणि पर्यटकांसोबत फोटोसाठी पोझ देण्यास सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्वरित पैसे हस्तांतरित करण्यासाठी या मुलींना क्यूआर कोडदेण्यात आले आहेत. हा प्रकार बालकांच्या शोषणाकडे निर्देश करतो, त्यामुळे यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

भाजपचे राजकारण आम्हाला मान्य नाही! कुर्टी-फोंडा मतदारसंघात मगोपचा स्वतंत्र उमेदवार: केतन भाटीकर

मगोपचे नेते केतन भाटीकर यांनी कुर्टी-फोंडा मतदारसंघात भाजपसोबत युतीचा उमेदवार न देण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपच्या या भूमिकेमागील कारण आपल्याला अज्ञात असल्याचे भाटीकर यांनी सांगितले. त्यांनी ठामपणे सांगितले की, मगोप आपला स्वतंत्र अनुसूचित जमातीचाउमेदवार रिंगणात उतरवेल आणि विजय निश्चित आहे. भाटीकर म्हणाले, "पक्षाने स्वतःला बळकट केले पाहिजे आणि आपले वरिष्ठ नेते आपल्या पाठीशी उभे राहतील, असा माझा विश्वास आहे. आम्ही भाजपच्या राजकीय दबावापुढे झुकणार नाही." कुर्टी-फोंडा ही पारंपारिकपणे मगोपची जागा असून, भाजपने ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे आश्चर्यकारक आहे. ते पुढे म्हणाले की, फोंडा विधानसभा पोटनिवडणूक देखील मगोप लढवणार आहे.

पेडणे पोलिसांची अंमली पदार्थांवर मोठी कारवाई; नायजेरियन नागरिकाकडून 1.05 लाखांचे ड्रग्ज जप्त

पेडणे पोलिसांनी कोरगाव, पेठेशावाडा येथून एका ४० वर्षीय नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १३ एक्स्टसी टॅब्लेट्स (3.66 ग्रॅम), २३.८८ ग्रॅम संशयित चरस (Charas), रोख ९,६०० रुपये आणि एक स्कूटर असा एकूण १.०५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

'ओंकार' हत्तीसाठी न्याय नाही; महाराष्ट्रातील नागरिकांकडून गोवा सरकारला कळकळीचे आवाहन

ओंकार नावाच्या हत्तीच्या प्रकरणात आपल्या राज्य सरकारने कारवाई करण्यात अपयश आल्याबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांनी तीव्र टीका केली आहे. आता ओमकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (Natural Habitat) सोडले जावे यासाठी गोवा वनमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) हेच न्याय मिळवून देऊ शकतात, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. ओमकार न्याय मागण्यासाठी गोव्यात आला आहे, असे मत व्यक्त करत महाराष्ट्रातील रहिवाशांनी गोवा सरकारला हत्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य पुनर्वसनासाठी (Rehabilitation) तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे. मंत्री राणे योग्य निर्णय घेऊन ओमकारला संरक्षण देतील, अशी प्रबळ अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेने गोव्याकडे व्यक्त केली आहे.

रुमडामावाडा येथे 'रॅश ड्रायव्हिंग'मुळे भीषण अपघात; 55 वर्षीय स्कूटरस्वाराचा मृत्यू

रुमडामावाडा येथे एका २० वर्षीय तरुणाने भरधाव वेगाने कार चालवत स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात सादा येथील मल्लिनाथ गौदार (वय ५५) हे स्कूटरस्वार गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

वाळपईत केशव सेवा साधना आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या विविध रोजगारसंधींचा शोध घेणे गरजेचे आहे. आज बँक, रेल्वे, पोस्ट, नाबार्ड, गोवा लोकसेवा आयोग, गोवा स्टाफ सिलेक्शन यांसारख्या क्षेत्रांत भरपूर संधी उपलब्ध आहेत.

मुरगाव नगरपरिषद बैठकीत महत्त्वाचे निर्णय; स्मशानभूमी नूतनीकरण, फिश मार्केट स्थलांतरणावर चर्चा

मुरगाव नगरपरिषदेची (MMC) परिषद बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शहराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि वादविवाद झाले. बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये, हिंदू स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करणे, विक्रेत्यांना नवीन वास्को फिश मार्केटमध्ये स्थलांतरित करणे यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.

भाजप-मगोप युती अंतिम! मगोपला 3 जागा, भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार: मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीतील भाजपच्या धोरणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, युतीमधील मगोप पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत आणि काही भागांमध्ये भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल.

आज घोषित झालेल्या उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. उर्वरित जिल्हा पंचायत उमेदवारांची घोषणा उद्या (मंगळवारी) केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसच्या झेडपी उमेदवारांची आज अंतिम घोषणा! संध्याकाळी 5:30 पर्यंत चित्र स्पष्ट होणार: अमित पाटकर

आगामी जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेबद्दल बोलताना गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, "आज आम्ही प्रदेश निवडणूक समितीची बैठक घेत आहोत. या बैठकीत उमेदवारांबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे." ते म्हणाले की, "आज संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होण्याबद्दलचे चित्र स्पष्ट होईल."

गोवा पोलिसांत निरीक्षकांच्या बदल्या; वाळपईचे शिराडकर कोलव्यात, तर कोलव्याचे नाईक वाळपईत

गोवा पोलिसांनी दोन पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. कोलवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांची बदली वाळपई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तर, वाळपई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांची बदली कोलवा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

नेसई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात आग; अग्निशमन दलाकडून 10 लाखांची मालमत्ता वाचवली

नेसई औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या युनिटला भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुरगाव अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे सुमारे १० लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT