Goa Live Updates | Goa Rain Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Update|राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपून काढणार; उद्या अति मुसळधार

राज्यात 13 ते15 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

पुढील काही दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोव्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची (>24 तासांत 20 सेमी) शक्यता आहे. मच्छिमारांना 5 दिवसांचा इशारा.

उद्या राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता

गोवा: राज्यात 13 ते15 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजेच 14 जुलै रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता गोवा हावामान खात्याने वर्तवली आहे.

ऑपरेशन लोटस अयशस्वी?

भाजपचा काँग्रेस पक्षातील गटबाजीशी काहीही संबंध नाही. आम्ही काँग्रेस पक्षाला उडवायचे ठरवले असते तर आम्ही थेट उडवले असते. असे अयशस्वी ऑपरेशन केले गेले नसते. असे विधान सदानंद तनवडे यांनी केले.

आरजीने उपस्थित केला दुहेरी मतदान कार्डाचा मुद्दा

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर दुहेरी मतदान कार्डाचा मुद्दा उपस्थित केला मतदान कार्ड नोंदणी निवडणूक आयोगाच्या हाती आहे. दरम्यान, या बाबीकडे लक्ष देण्याची सरकारला विनंती त्यांनी केली.

TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर करणार

TCP मंत्री विश्वजित राणे यांनी बेकायदेशीररित्या टेकडी कापणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर कारवाई करेल आशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या परिश्रमाची या पक्षात काहीच किंमत नाही; दिगंबर कामत

2017 मध्ये काँग्रेसला स्पष्ट जनादेश असतानाही, पक्षाने मला सरकार स्थापनेसाठी निवडले नाही. आणि आम्ही संधी गमावली. 2022 मध्ये निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व करणारा मी एकमेव आमदार होतो. आणि हाच त्यांना पुरस्कार आहे. माझ्याबाबतीत अपात्रता याचिका दाखल करून देत आहे. इतक्या वर्षापासून पक्षासाठी केलेल्या माझ्या परिश्रमाची या पक्षात काहीच किंमत नाही असे मला वाटते.

दिगंबर कामत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atiq Ahmed Son Death: भरधाव वेग अन् अचानक नियंत्रण सुटलं! गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाच्या कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; 6 दिवसांनंतर भयानक वास्तव आलं समोर

Candolim Illegal Project: शेतात सांडपाणी अन् खारफुटीची कत्तल! कांदोळीतील बेकायदा प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत; मुख्‍यमंत्र्यांकडे तक्रार

Goa FDA Action: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

Calangute Crime News: कळंगुट पोलिसांना फोन आला अन्... कारचे दार उघडताच बसला मोठा धक्का; 41 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Par River Pollution: अस्नोडातील पार नदीच्या प्रदूषणाची गंभीर दखल! 'या' रिसॉर्टची ग्रामस्थांकडून पोलखोल; मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT