Pak Vs Zim Dainik Gomantak
क्रीडा

Pak Vs Zim: पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव! एक धाव राखून झिम्बाब्वेने केले पराभूत

कर्णधार बाबर आझम या सामन्यात देखील अपयशी ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

भारताकडून पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून दुसरा झटका बसला आहे. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला आहे. केवळ एका धावेने पाकिस्तानचा पराभव झाला आहे. यामुळे पाकिस्तानचे T20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान आणखी कठिण झाले आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले 131 धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आले नाही.

झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करत मर्यादीत वीस षटकांत 130 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सीन विल्यमसने सर्वाधिक 31 धावा केल्या. आठ गड्यांच्या बदल्यात झिम्बाब्वेला 130 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून, मो. वसीने चार, शादाब खानने तीन आणि रौफने एक बळी घेतला.

झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम या सामन्यात देखील अपयशी ठरला. तो केवळ चार धावा करून बाद झाला. त्यानंतर शान मसूदने सर्वाधिक 44 धावा पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. अखेरच्या चेंडूत तीन धावा हव्या असताना, मारलेल्या फटक्यातून केवळ दोन धावा काढता आल्या आणि झिम्बाब्वेचा एक धाव राखून विजय झाला.

दरम्यान, या पराभवामुळे पाकिस्तानचा T20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवास कठिण झाला आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामना पाकिस्तानसाठी करो या मरो असेल. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तान कशा पद्धतीने तयारी करतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT