Heath Streak Twitter
क्रीडा

Heath Streak: झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड; पत्नीची भावूक पोस्ट

Heath Streak Died: झिम्बाब्वेच्या स्टार ऑलराउंडरचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे

Pranali Kodre

Zimbabwe Cricketer Heath Streak passed Away:

झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक याचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी (3 सप्टेंबर) पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची पुष्टी त्याच्या कुटुंबाकडूनच करण्यात आली आहे.

यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी त्याच्या निधनाबद्दल अफवा पसरली होती, पण त्यानंतर तो जिवंत असल्याचे समजले आहे. मात्र, आता त्याच्या कुटुंबाकडूनच त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. तो कोलन आणि लिव्हर कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याचा हा लढा थांबला आहे.

स्ट्रीकची पत्नी नादिनने त्याच्या निधनाची पोस्ट केली आहे. तिने त्याच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'रविवारी, 3 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे माझे प्रेम आणि माझ्या मुलांचे वडील त्याच्या घरापासून देवाघरी गेला आहे. त्याची इच्छा होती की शेवटच्या काही दिवसात त्याच्याभोवती त्याचे कुटुंबा आणि त्याच्या प्रेमाची माणसे असावीत.

'त्याला प्रेमाने आणि शांततने गुंडाळलेले असून तो एकटा पार्कमधून बाहेर गेलेला नाही. स्ट्रिकी आपले आत्मा अनंतकाळासाठी जोडलेले आहेत. मी तुला पुन्हा भेटेल.'

Nadine Streak

स्ट्रिक झिम्बाब्वेचा माजी कर्णधारही होता. तो 90 च्या दशकाच्या शेवटी आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात झिम्बाब्वे संघाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होता. तो गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजीही करायचा

स्ट्रिकने त्याच्या कारकिर्दीत 65 कसोटी आणि 189 वनडे सामने खेळले आहेत. झिम्बाब्वेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये 216 आणि वनडे सामन्यात 239 विकेट्स घेतले. तसेच त्याने कसोटीत 1990 धावा केल्या आणि वनडेत 2943 धावा केल्या.

तो झिम्बाब्वेकडून वनडे आणि कसोटीत 100 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 1,000 धावा आणि 100 विकेट घेण्याची कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा पहिला आणि एकमेव खेळाडू होता.

त्याने निवृत्तीनंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्याने विविध संघांच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केले. मात्र आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एप्रिल 2021 मध्ये स्ट्रीकवर क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या सहभागावर आठ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT