Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: सूर्य उगवणार! टीम इंडियातून वगळल्यानंतर युझी चहलची सूचक पोस्ट व्हायरल

Yuzvendra Chahal Post: आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून चहलला वगळण्यात आल्यानंतर चहलने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Pranali Kodre

Yuzvendra Chahal Social Media Post after dropped from India Asia Cup 2023 squad:

सोमवारी बीसीसीआयच्या निवड समीतीने 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी 17 जणांच्या भारतीय संघाची निवड केली आहे. पण या संघातून अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला वगळण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

दरम्यान, त्याला संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने सोमवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्याची आता चर्चा होत आहे. तथापि चहलने ही पोस्ट आशिया चषकानंतर केल्याने त्यातून त्याने त्याला संघातून वगळल्याने भावना व्यक्त केल्या असल्याचा कयास लावला जात आहे.

युजवेंद्र चहलने या पोस्टमध्ये इमोजींचा वापर केला आहे. त्याने ढगांमागे असलेला सूर्य आणि त्यापुढे बाण दाखवून लख्ख प्रकाश देणारा सूर्य असे इमोजी वापरले आहेत. यातून त्याला पुढे त्याच्यासाठी उज्वल दिवस आहेत किंवा काळे ढग आले, तरी सूर्य उगवतोच असे सांगायचे असल्याचा अंदाज लावला जात आहे.

रोहित - अगरकरने सांगितले कारण

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी चहलला वगळण्यामागील कारण स्पष केले होते.

रोहित म्हणाला, 'आमच्या संघात केवळ 17 खेळाडूंनाच जागा असल्याने आम्हाला चहलला घेता आले नाही. वर्ल्डकपसाठी रवी अश्विन, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर कोणासाठीही दारं बंद झालेली नाहीत.'

याशिवाय अगरकरनेही चहलला बाहेर करण्याबद्दल सांगितले, 'कामगिरी चांगली आहे, पण आम्हाला संघाचा समतोल राखण्याकडेही लक्ष द्यावे लागते. दोन मनगटी फिरकीपटूंना खेळवणे कठीण आहे. आम्ही केवळ एका मनगटी फिरकीपटूला संधी देऊ शकतो. संघातून बाहेर होणे दुर्दैवी आहे, पण सध्या कुलदीत थोडा आघाडीवर आहे.'

दरम्यान, कुलदीपची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी चांगली झालेली आहे. तो 2023 वर्षात वनडेत सर्वाधिक 22 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे.

मात्र, चहलला गेल्या काही महिन्यांमध्ये वनडेत फारशी संधी मिळालेली नाही. त्याने 2023 वर्षात केवळ दोनच वनडे सामने खेळले आहे. या 2 सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT