Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

Yuzvendra Chahal: 'RCB ने बाहेर केल्यावर खूप राग आला, पहिल्या मॅचमध्ये तर...' चहलचं मनातलं दु:ख आलं ओठांवर

Pranali Kodre

Yuzvendra Chahal opened up on released by RCB before 2022 IPL auction:

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक काळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला. पण 2022 आयपीएलपूर्वी झालेल्या मेगा लिलावाआधीच त्याला बेंगलोर संघाने बाहेर केले. अखेर त्याला लिलावात राजस्थान रॉयल्सने संघात घेतले.

आता याबद्दल चहलने जवळपास दीड वर्षांनी मौन सोडले असून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. युट्युबर रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुखाखतीत चहलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सांगितले आहे की बेंगलोरने त्याला लिलावात खरेदी करतील असे सांगितले होते. पण तसे झाले नाही.

चहल म्हणाला, 'मी त्यांच्यासाठी 8 वर्षे खेळलो. खरंतर आरसीबीने मला भारतीय संघाची कॅप मिळवून दिली. कारण त्यांनी मला कामगिरी दाखवण्याची संधी दिली. पहिल्या सामन्यासाठी विराट भैय्याने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे बाहेर झाल्याचे वाईट वाटले. जेव्हा तुम्ही 9 वर्षे एका संघात राहाता, तेव्हा तो संघ तुम्हाला कुटुंबासारखा वाटायला लागतो.'

'मी खूप पैसे मागितले वैगरे, अशा अफवाही आल्या. मी त्यावेळीही स्पष्ट केले होते की असे काही झाले नाही. मला मी कशासाठी पात्र आहे, हे माहित आहे.'

32 वर्षीय चहल पुढे म्हणाला, 'मला सर्वात वाईट वाटलं करण मला कोणताही फोन आला नाही, कोणताही संवाद साधण्यात आला नाही. किमान चर्चाही झाली नाही. मी त्यांच्यासाठी 113 सामने खेळलो. लिलावात ते मला काहीही करून घेतील, असे वचन देण्यात आले होते. मी म्हणालो, ठिक आहे.'

'पण, जेव्हा मला त्यांनी घेतले नाही, तेव्हा मी खूप चिडलो होतो. मी आरसीबीच्या प्रशिक्षकांशी बोललो नाही. जेव्हा मी आरसीबीविरुद्ध पहिला सामना खेळलो, मी कोणाशीही बोललो नाही.'

चहलने पुढे सांगितले की वेळेबरोबर सर्व ठिक होत गेले आणि जे झाले ते चांगल्यासाठीच होते. तो म्हणाला, 'मला जाणवले की लिलाव हे बेभरवशी ठिकाण आहे. त्यामुळे मी जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत सत्य स्विकारले. मी राजस्थान रॉयल्सकडून अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करायला लागलो.'

'आरसीबीमध्ये साधारणत: माझा स्पेल 16 ओव्हरच्या आधी संपायचा. त्यामुळे मला वाटते एक क्रिकेटपटू म्हणून मी राजस्थान रॉयल्समध्ये अधिक परिपक्व झालो. त्यामुळे जे होते, ते चांगल्यासाठीच होते.'

'माझी नक्कीच आरसीबीशी आणि त्यांच्या चाहत्यांशी बांधिलकी आहे. पण क्रिकेटच्या दृष्टीने राजस्थान रॉयल्समध्ये येण्याने मला मदत झाली.'

चहल आरसीबीसाठी 2014 ते 2021 दरम्यान 113 सामने खेळला. यादरम्यान त्याने बेंगलोरसाठी 139 विकेट्स घेतल्या. तो 2022 आणि 2023 हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT