Yuzvendra Chahal: प्रेम हे! चहलने 300 विकेट्स घेताच पत्नी धनश्रीचा आनंद गगनात मावेना, पाहा Video

युझवेंद्र चहलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कारकिर्दीत ३०० टी२० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला.
Dhanashree Verma and Yuzvendra Chahal
Dhanashree Verma and Yuzvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

Yuzvendra Chahal 300 T20 Wickets: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने ७२ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात युजवेंद्र चहलने महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात मयंक अगरवाल, हॅरी ब्रुक, आदील राशीद आणि भुवनेश्वर कुमार यांना बाद केले. त्याने ४ षटकात १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने टी२० कारकिर्दीत ३०० विकेट्सही पूर्ण केल्या. तो ३०० टी२० विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच, तर जगातील १६ वा गोलंदाज आहे.

धनश्रीचा आनंद गगनात मावेना

दरम्यान, चहलने विकेट घेतल्यानंतर त्याची पत्नी धनश्री वर्माला खूपच आनंद झाल्याचे दिसले. ती देखील स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी आली होती. ज्यावेळी चहलने विकेट घेतली, तेव्हा ती खूपच आनंदाने टाळ्या वाजवत होती. तिचा व्हिडिओ देखील राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

चहलच्या 300 विकेट्स

चहलच्या आता टी२० क्रिकेटमध्ये २६५ सामन्यांमध्ये २३.६० च्या सरासरीने ३०३ विकेट्स झाल्या आहेत. यातील १२१ विकेट्स त्याने भारताकडून ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना घेतल्या आहेत. तसेच त्याने १७० विकेट्स आयपीएलमध्ये घेतल्या आहेत.

तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज देखील आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सकडून सामने खेळले आहेत. त्याचबरोबर उर्वरित १२ टी२० विकेट्स त्याने भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळताना घेतल्या आहेत.

राजस्थानचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलर(५४), संजू सॅमसन (५५) आणि यशस्वी जयस्वाल (५४) यांनी अर्धशतके केली. त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 5 बाद 203 धावा केल्या. २०४ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदाराबादला 8 बाद 131 धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक ३२ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com