Yuvraj Singh | Team India Dainik Gomantak
क्रीडा

Yuvraj Singh: 'अखेर 23 वर्षांपूर्वीची परतफेड झालीच...', भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर युवीचं ट्वीट चर्चेत

Asia Cup 2023: भारतीय संघाने श्रीलंकेला फायनलमध्ये पराभूत करत आशिया चषक जिंकल्यानंतर युवराज सिंगने केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh Social Media Post after Team India Won Asia Cup 2023 :

भारत आणि श्रीलंका संघात रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने विजय मिळवत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

यानंतर भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये युवराज सिंगचाही समावेश आहे. दरम्यान, युवराजने पोस्ट शेअर करताना 23 वर्षांपूर्वीच्या एका सामन्याचीही आठवण करून देत पाठीवरचं ओझं उतरल्याचं म्हटलं आहे.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले की 'अखेर आमच्या पाठीवरचे ओझे उतरले. 23 वर्षांपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 54 धावांवर शारजाहमध्ये सर्वबाद झाला होता. आशिया चषकातील वर्चस्वपूर्ण कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन. आशा आहे की हीच लय वर्ल्डकपमध्ये कायम राहिल.'

23 वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना शारजाह येथे झाला होता. त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 299 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला 26.3 षटकात 54 धावांवर सर्वबाद केले होते. त्यावेळी युवराज सिंग देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. तो 3 धावांवर बाद झाला होता.

त्यानंतर आता रविवारी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती, पण श्रीलंकेचा डाव 15.2 षटकातच 50 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस (17) आणि दुशन हेमंता (13) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यातील 4 विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली.

त्यानंतर भारताने 51 धावांचे आव्हान अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. त्याचमुळे या दोन सामन्यांची तुलना करत युवराजने परतफेड झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भारताने एकूण आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT