IND vs SL Final: अवघ्या सव्वा दोन तासांत श्रीलंकेचा 'खेळ' खल्लास अन् सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा सुळसुळाट

Asia Cup 2023: अवघ्या 129 चेंडूतच भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत आशिया कप जिंकल्यानंतर मीम्स व्हायरल झाले आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Memes Viral After India beat Sri Lanka by 10 Wickets in Asia Cup Final 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना अवघा सव्वा दोन तासाचा झाला.

या सामन्याला पावसामुळे जवळपास पाऊणतास उशीराने सुरुवात झाली होती. त्यामुळे हा सामना दुपारी भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारण पावणे चारच्या सुमारास सुरू झाला, तर 6 वाजल्याच्या सुमाराला भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले.

Team India
Asia Cup 2023: भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने फायनलमध्ये उडवला धुव्वा

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेचा डाव अवघ्या 15.2 षटकात म्हणजे 92 चेंडूतच संपला. श्रीलंकेने सर्वबाद 50 धावाच केल्या.

श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दुशन हेमंता यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. मेंडिसने 17 धावा केल्या, तर हेमंता 13 धावावंर नाबाद राहिला. श्रीलंकेचे 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यातील 4 विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली.

Team India
Asia Cup Final: सिराजने श्रीलंकेला नाचवले! भारतासमोर चॅम्पियन बनण्यासाठी 51 धावांचे आव्हान

त्यानंतर भारताने केवळ 37 चेंडूतच म्हणजेच 6.1 षटकात 51 धावांचे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेले इशान किशन 23 धावांवर आणि शुभमन गिल 27 धावांवर नाबाद राहिले.

या सामन्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले आहेत.

दरम्यान भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com