Yuvraj Singh - Prakhar Chaturvedi X/BCCI
क्रीडा

Yuvraj Singh: प्रखरने 404 धावा ठोकत मोडला 24 वर्षे जुना विक्रम, पण युवी म्हणतोय, 'आनंदच आहे की...'

Prakhar Chaturvedi: प्रखर चतुर्वेदीने 404 धावांसह 24 वर्षे जुना विक्रम मोडल्यानंतर युवराज सिंगने मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh react on Prakhar Chaturvedi surpassed his 24-year-old record of 358 runs in Cooch Behar Trophy final:

भारतात सध्या देशांतर्गक क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरू असून नुकताच 19 वर्षांखालील प्रथम श्रेणी स्पर्धा कुच बिहार ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना झाला. कर्नाटक आणि मुंबई या 19 वर्षांखालील संघात झालेल्या सामन्यात एक मोठा विक्रम रचला गेला.

या सामन्यात कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज प्रखर चतुर्वेदी याने नाबाद 404 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी 638 चेंडूत 46 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने केली. त्याने ही खेळी करताना युवराज सिंगचा विक्रमही मोडला. याबद्दल खुद्द भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराजने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रखर कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता.

युवराजने 24 वर्षांपूर्वी 1999-00 च्या हंगामात कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंजाबकडून खेळताना बिहारविरुद्ध 358 धावांची खेळी केली होती.याच सामन्यात बिहारकडून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीही खेळला होता.

प्रखरच्या या कामगिरीनंतर युवराजने ट्विट केले आहे. युवराजने ट्वीचमध्ये लिहिले की 'हे पाहून आनंद झाला. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि भारतीय संघाचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचा मला आनंद आहे.'

दरम्यान, प्रखर कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासाच सर्वोच्च खेळी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर विजय झोल असून त्याने 2011-12 हंगामात महाराष्ट्र संघासाठी आसामविरुद्ध 451 धावांची नाबाद खेळी केली होती.

सामना अनिर्णित

कुच बिहार ट्रॉफी 2023-24 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 113.5 षटकात सर्वबाद 380 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रखरच्या मॅरेथॉन खेळीनंतर कर्नाटकने पहिल्या डावात 223 षटकात 8 बाद 890 धावा केल्या.

कर्नाटककडून प्रखर व्यतिरिक्त हर्षिल धर्मानीनेही 169 धावांची दीड शतकी खेळी केली. दरम्यान, सामन्याचे दिवस पूर्ण झाल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. पण सामना अनिर्णित राहिला, तेव्हा कर्नाटककडे 510 धावांची आघाडी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT