Virat Kohli | Yuvraj Singh | MS Dhoni | Ashish Nehra Dainik Gomantak
क्रीडा

Yuvraj Singh: 'विराटने खूप पाठिंबा दिला, तर धोनीने...', युवराजने केला गौप्यस्फोट

युवराज सिंगने त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल बोलताना विराट कोहली आणि एमएस धोनीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh on Virat Kohli and MS Dhoni: भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे क्रिकेटविश्वातील योगदान मोठे राहिले आहे. त्याने कारकिर्दीत 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना अनेकदा अविस्मरणीय खेळीही केल्या.

युवराज 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. तो भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळणाराही खेळाडू आहे. तो 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये मालिकावीरही ठरला होता. पण त्या वर्ल्डकपनंतर त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

त्यामुळे त्यावरील उपचारामुळे युवराज सिंगला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. पण त्याने पुनरागमन केले, मात्र संघातील स्थान टिकवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.

दरम्यान, त्याच्या पुनरागमनानंतर त्याला विराट कोहलीकडून कसा पाठिंबा मिळाला आणि एमएस धोनीने त्याच्यासमोर वास्तव कसे समोर ठेवले, याबद्दल त्याने सांगितले आहे.

युवराजने न्यूज 18 शी बोलताना सांगितले की 'मी जेव्हा पुनरागमन केले तेव्हा, विराट कोहलीने मला पाठिंबा दिला होता. त्याने जर मला पाठिंबा दिला नसता, तर मी पुनरागमन करू शकलो नसतो. पण तो धोनी होता, ज्याने मला 2019 वर्ल्डकपबद्दलचे खरे चित्र माझ्यासमोर ठेवले की निवडकर्ते माझा विचार करत नाहीयेत.'

'त्याने मला खरे चित्र दाखवले. त्याने मला स्पष्टता दिली. तो जे करू शकत होता, ते सर्व त्याने केले.'

तसेच युवराजने सांगितले की 2011 वर्ल्डकपपर्यंत धोनीने त्याच्यावर खूप विश्वास दाखवला. धोनी आणि युवराज यांनी मिळून अनेक अविस्मरणीय भागीदाऱ्याही केल्या आहेत.

युवराजने सांगितले की '2011 वर्ल्डकपपर्यंत धोनीने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि तो मला नेहमी म्हणायचा की 'तू माझ्या महत्त्वाचा खेळाडू आहेस.' पण मी आजारातून परत आल्यानंतर खेळ बदलला होता आणि संघातही अनेक बदल झाले होते. त्यामुळे जोपर्यंत 2015 वर्ल्डकपचा विषय आहे, त्यावर खरंच तुम्ही कशावर बोट ठेवू शकत नाही. त्यामुळे तो खूप वैयक्तिक निर्णय होता.'

'त्यामुळे मला समजते की एक कर्णधार म्हणून तुम्ही सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. कारण शेवटी तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागते की देशाचा संघ कशी कामगिरी करत आहे.'

युवराजने त्याच्या कारकिर्दतील अखेरचा सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने 2019 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT