Yashasvi Jaiswal X/BCCI
क्रीडा

Yashasvi Jaiswal: इंग्लंडला चोपणारा जयस्वालला ICC चा मोठा पुरस्कार जाहीर, विलियम्सनलाही टाकलं मागे

ICC Player of The Month: मंगळवारी आयसीसीने यशस्वी जयस्वालला मोठा पुरस्कार जाहीर केला आहे.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal won ICC Men's Player of the Month for February 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (12 मार्च) फेब्रुवारी 2024 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पुरुषांच्या विभागात, तर ऑस्ट्रेलियाच्या ऍनाबेल सदरलँडने महिलांच्या विभागात हा पुरस्कार जिंकला.

आयसीसीकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार दिला जातो. त्यानुसार फेब्रुवारी 2024 महिन्यासाठीही हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जयस्वाल फेब्रुवारी 2024 मधील सर्वोत्तम पुरुष खेळाडू

जयस्वालने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीचा फेब्रुवारी 2024 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.

जयस्वालने हा पुरस्कार जिंकताना न्यूझीलंडच्या केन विलियम्सन आणि श्रीलंकेच्या पाथम निसंका यांना मागे टाकले आहे. विलियम्सन आणि निसंका यांनाही या पुरस्कारासाठी जयस्वालसह नामांकन मिळाले होते. पण त्यांना मागे टाकत जयस्वालने पुरस्कारावर नाव कोरले आहे.

जयस्वालने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना खेळला. त्याने या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग दोन द्विशतके ठोकली. तसेच चौथ्या कसोटीतही त्याने अर्धशतक ठोकले.

जयस्वाल कसोटीत 2 द्विशतके करणारा तिसऱ्या क्रमांकाच सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याने फेब्रुवारीमध्ये 112 च्या सरासरीने 560 धावा ठोकल्या होत्या.

जयस्वालने हा पुरस्कार जिंकल्याबद्दल बीसीसीआयनेही अभिनंदन केले आहे.

सदरलँड फेब्रुवारी 2024 मधील सर्वोत्तम महिला खेळाडू

फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या ऍनाबेल सदरलँडने जिंकला आहे.सदरलँडने फेब्रुवारीमध्ये 229 धावा करण्याबरोबरच 7 विकेट्स घेतल्या.

सदरलँड्सने हा पुरस्कार जिंकताना संयुक्त अरब अमिरातीच्याही इशा ओझा आणि काविशा एगोडेज यांनाही मागे टाकले आहे. त्यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Goa Assmbly Live: साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित, डीओपीने त्यांच्यावर कारवाई केली नाही

SCROLL FOR NEXT