ICC Player of The Month: कोण ठरणार फेब्रुवारीतील सर्वोत्तम क्रिकेटर? ICC कडून जयस्वालसह 'या' खेळाडूंना नामांकन

ICC Men's Player of the Month nominees for February: आयसीसीने फेब्रुवारी 2024 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केले आहेत.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Men's Player of the Month nominees for February:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार दिला जातो. त्यासाठी आधी तीन-तीन खेळाडूंना नामांकने दिली जातात. यंदा फेब्रुवारी 2024 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताच्या यशस्वी जयस्वालला नामांकन मिळाले आहे.

त्याच्यासह या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आणि श्रीलंकेचा फलंदाज पाथम निसंका यांनाही नामांकन मिळाले आहे.

जयस्वाल, विलियम्सन आणि निसंका यांनी फेब्रुवारी महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. जयस्वालने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना खेळला.

त्याने या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग दोन द्विशतके ठोकली. तसेच चौथ्या कसोटीतही त्याने अर्धशतक ठोकले. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 पर्वातील सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला.

Yashasvi Jaiswal
ICC Test Ranking: जयस्वालने रोहितला टाकले मागे; रांची कसोटी गाजवलेल्या जुरेल-गिलनेही घेतली मोठी झेप

तसेच त्याने दोन सलग द्विशतके ठोकली तेव्हा त्याचे वय 22 वर्षे 49 दिवस होते. त्यामुळे तो कसोटीत दोन द्विशतके करणारा सर डॉन ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्यानंतर सर्वात कमी वयाचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने फेब्रुवारी महिन्यात 112 च्या सरासरीने 560 धावा ठोकल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे तो हा पुरस्कार जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

केन विलियम्सनसाठीही फेब्रुवारी महिना विक्रमी ठरला. तो फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळला. या मालिकेत त्याने सलग तीन शतके ठोकली. याबरोबर त्याने आत्तापर्यंत 32 कसोटी शतके करण्याचा पराक्रमही केला. त्याने सर्वात कमी 172 डावातच 32 शतके केली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात पाथम निसंकाने अफगाणिस्तानविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळली. त्याने पहिल्याच वनडेत नाबाद 210 धावांची द्विशतकी खेळीही केली. तो वनडेत द्विशतक करणारा श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू ठरला.

Yashasvi Jaiswal
Wanindu Hasaranga Suspended: वानिंदू हसरंगाला मोठा झटका, ICC नं केलं सस्पेंड; अफगाणिस्तानच्या खेळाडूलाही शिक्षा

त्याने तिसऱ्या वनडेतही 118 धावांची शतकी खेळी केली. तसेच टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही नाबाद 60 धावांची खेळी केली. त्यामुळे तो देखील फेब्रुवारीमध्ये सर्वोत्तम पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहे.

सर्वोत्तम महिला खेळाडूंसाठी नामांकने

फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाच्या ऍनाबेल सदरलँडला नामांकन मिळाले आहे. याबरोबरच संयुक्त अरब अमिरातीच्याही इशा ओझा आणि काविशा एगोडेज यांनाही या पुरस्कारासाठी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

सदरलँडने फेब्रुवारीमध्ये 229 धावा करण्याबरोबरच 7 विकेट्स घेतल्या. तसेच इशाने 249 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या, तर काविशाने 218 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com