Yashasvi Jaiswal X
क्रीडा

IND vs ENG: ...सिक्स, फोर अन् जयस्वालचं खणखणीत द्विशतक, टीममेट्सकडूनही खास कौतुक, पाहा Video

Yashasvi Jaiswal Double Century: यशस्वी जयस्वालने विशाखापट्टणमला इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून द्विशतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Yashasvi Jaiswal Double Century:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात विशाखपट्टण येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू आहे. या सामन्यात भारताकडून दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतकी खेळी केली आहे.

जयस्वालने 102 व्या षटकात शोएब बशीरविरुद्ध पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत त्याच्या पहिल्या-वहिल्या आंतरराष्ट्रीय द्विशतकाला गवसणी घातली. त्याने 277 चेंडूत त्याचे हे द्विशतक पूर्ण केले.

जयस्वालने या सामन्याच्या पहिल्या दिवशी 151 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. तो 179 धावांवर पहिल्या दिवसाखेर नाबाद होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशीही आपली लय कायम ठेवली आणि द्विशतक ठोकले.

त्याने द्विशतक ठोकल्यानंतर हवेत उडी मारत आणि बॅट उंचावत सेलिब्रेशन केले. यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले.

दरम्यान, जयस्वाल सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर यांच्यानंतर भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा डावखुरा फलंदाज आहे. कांबळीने दोनदा कसोटीत द्विशतके केली आहेत. तसेच गांगुली आणि गंभीर यांनी प्रत्येकी एकदा कसोटीत द्विशतक केले आहे.

तथापि, द्विशतक केल्यानंतर काहीवेळातच जयस्वाल बाद झाला. त्याला 107 व्या षटकात जेम्स अँडरसनने जॉनी बेअरस्टोच्या हातून झेलबाद केले. जयस्वालने 290 चेंडूत 209 धावा केल्या. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 7 षटकार मारले.

दरम्यान, जयस्वाल भारताच्या पहिल्या डावातील 8 व्या विकेटच्या रुपात बाद झाला. तो बाद होईपर्यंत भारताकडून पहिल्या डावात त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 40 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. जयस्वालनंतर भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर रजत पाटीदारने 32 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT