Zubin Bharucha - Yashasvi Jaiswal X/rajasthanroyals and ANI
क्रीडा

Yashasvi Jaiswal: 'तब्बल 300 वेळा एक शॉट...', जयस्वालचा पॉवर गेम 'यशस्वी' होण्यामागील ब्रेन, कोण आहे झुबीन भरुचा?

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal credited Zubin Bharucha for his power game:

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रविवारी (18 फेब्रुवारी) 434 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात द्विशतकी खेळी करत यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला.

जयस्वालने दुसऱ्या डावात 236 चेंडूत नाबाद 214 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 12 षटकार मारले. दरम्यान, सामन्यानंतर जिओ सिनेमाच्या पोस्ट मॅच शोमध्ये त्याला त्याच्या मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेबद्दल भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने प्रश्न विचारला होता. त्यावर जयस्वालने यासाठी झुबीन भरुचा यांना श्रेय दिले होते.

दरम्यान, अनेकांना भरुचा कोण आहेत हे माहित नसेल. तर भरुचा हे मुंबईचे माजी क्रिकेटपटू आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आहेत.

भरुचा यांनी यांनी मुंबई आणि सरे (काउंटी क्लब) या संघांसाठी क्रिकेट खेळले आहे. त्यांनी 17 प्रथम श्रेणी सामन्यांत 42.54 च्या सरासरीने 3 शतके आणि 4 अर्धशतकांसह 1021 धावा केल्या आहेत. ते मुंबई संघात त्यावेळी खेळले, जेव्हा त्या संघात रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर असे अनेक दिग्गज खेळाडू होते.

जयस्वाल देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून आणि आयपीएल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. त्यामुळे त्याचा त्यांच्याची जवळचा संबंध आला आहे. राजस्थान रॉयल्सच्या ट्रायल्समध्येही भरुचा यांनीच जयस्वालमधील क्षमता हेरली होती.

जयस्वालच्या क्षमतेबद्दल आणि कौशल्याबद्दल भरुचा यांनी भारत विरुद्ध इंग्लंड संघात विशाखापट्टणला झालेल्या कसोटी सामन्याबद्दल पीटीआयशी बोलताना भरभरून कौतुक केले होते. तसेच त्याने गेल्या काही वर्षात कशी तयारी केली आहे आणि किती मेहनत घेतली आहे, याबद्दलही सांगितले होते.

विशाखापट्टण कसोटीतही जयस्वालने द्विशतकी खेळी केली होती. भरुचा यांनी सांगितले होते की 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2020 नंतर तो आयपीएलमध्ये आला होता. त्याने जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या एका ट्रायलमध्ये खेळलेल्या फ्लिक शॉटने त्यांना प्रभावित केले होते. त्यावेळी त्याच्या शॉटवेळी त्याच्यात असलेल्या आत्मविश्वासाने भरुचा प्रभावित झाले होते.

त्याचबरोबर भरुचा यांनी सांगितले की जयस्वालला तो कुठून आला आहे आणि कसा आला आहे याबद्दल जाणीव आहे.

त्यांनी सांगितले की काहीवर्षांपूर्वी महाराष्ट्रातील नागपूरपासून 90 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या टाळेगाव येथे त्याच्या खेळावर बरीच मेहनत घेतली होती.

भरुचा म्हणाले, 'नागपूरपासून 90 मिनिटाच्या अंतरावर टाळेगाव आहे. त्यावेळी हेतू हा होता की त्याला एकट्याला तिथे ठेवायचे, जेणेकरून तो तिथे जाईल आणि केवळ त्याच्या मानसिकतेवर लक्ष केंद्रीत करेल. कोविड दरम्यान देखील तो तिथे राहिला होता आणि सराव केला होता. त्यावेळीही त्याच्या सरावात खंड पडला नव्हता.'

त्याचबरोबर रॉयल्स ऍकेडमीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रेनिंग पद्धतीबद्दलही भरुचा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की एकाच प्रकारचा शॉट 300-300 वेळाही सातत्याने खेळवला जातो, जोपर्यंत त्यात योग्य प्रकारचे सातत्य येत नाही.

भरुचा यांनी म्हटले जरी कसोटी क्रिकेट असो किंवा टी20 सामना असूदे, चेंडू जर त्याच जागेवर पडला, तर तुम्ही त्याचा कसा सामना करतो, हे महत्त्वाचे असते, हाच आमचा महत्त्वाचा हेतू आहे. जर एखाद्या दिवशी एखादा शॉट खेळण्यात अडचण होत असेल, तर त्याच शॉटवर लक्ष केंद्रित केले जाते.

त्यांनी सांगितले की 'आमचा नेहमीच प्रयत्न राहिला की खेळाडूमधील कमजोर गोष्टी कमी करणे. जयस्वालची ऑन-साईडला खेळण्यात कमजोरी होती. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर खूप मेहनत घेतली. ज्याच्या त्याला खूप फायदा झाला आहे.'

त्याचबरोबर जयस्वालच्या मोठे फटके मारण्याच्या क्षमतेसाठी बेसबॉलमधील तंत्राचा वापर करण्यात आला होता. भारूचा यांनी सांगितले की 'पूर्वी जयस्वालला चेंडूशी संपर्क करताना कोपर वाकलल्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी ताकद निर्माण करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी बेसबॉलमधील बॅटर प्रमाणे चेंडू मारण्याच्या पद्धतीवर काम करणे सुरू केले.'

'जवळपास दोन वर्षांपूर्वी त्याच्यासाठी हे नैसर्गिक नव्हते, पण हळुहळू त्याला त्याची सवय होत गेली. तो अजूनही चेंडू खेळताना कोपर वाकवतो, पण ते आता सुरुवातीपेक्षा खूप कमी झाले आहे.'

याशिवाय भारुचा यांनी सांगितले की जयस्वालकडून रोज 200 लॉब्सही करून घेतले होते. लॉब्स म्हणजे म्हणजेच वेगवेगळ्या वजनाच्या बॅट आणि चेंडू वापरणे आणि 100 मीटरवर प्रत्येक चेंडूला फटकावणे. ज्यामुळे अनेकदा त्याच्या हाताच्या तळव्यांवर फोड यायचे. मात्र, त्याने इथपर्यंत पोहचण्यासाठी त्या वेदना सहन केल्या आहेत.'

दरम्यान, गेल्या चार हंगमापासून राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याला या संघाकडून पहिल्या तीन हंगामात फार प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.

मात्र, 2023 आयपीएलपूर्वी त्याच्या खेळात मोठा फरक जाणवला. त्याने या हंगामात शानदार खेळ करत 14 सामन्यांत 48 च्या सरासरीने 625 धावा ठोकल्या होत्या. यात एका शतकाचा आणि 5 अर्धशतकांचाही समावेश होता.

इतकेच नाही, तर त्याने 2023 आयपीएलनंतर भारताकडूनही पदार्पण केले. तो आता भारतीय संघातील नियमित सदस्यही झाला आहे. त्याने कसोटीत तर 8 सामन्यांतच 861 धावा फटकावल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT