Yashasvi Jaiswal X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: षटकारासह जयस्वालने झळकावलं दुसरं कसोटी शतक, BCCI ने शेअर केला तो खास क्षण

Yashasvi Jaiswal Century: विशाखापट्टणमला होत असलेल्या कसोटी सामन्यात भारताकडून इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालने शतक झळकावले.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Yashasvi Jaiswal Century Video:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. विशाखापट्टणमला होत असलेल्या या सामन्यात भारताचा 22 वर्षीय फलंदाज यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला उतरला. या दोघांनी चांगली सुरुवातही केली होती. मात्र रोहित १४ धावांवर बाद झाला.

नंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिलने काही चांगले फटके खेळले, मात्र तोही 34 धावांवर बाद झाला. पण असे असले तरी जयस्वालने आपला खेळ कायम ठेवला.

त्याने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फटकेबाजी केली. तसेच पहिल्या दिवसाच्या दुसऱ्याच सत्रात त्याने 49 व्या षटकात टॉम हर्टलीविरुद्ध षटकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले.

त्याने 151 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे जयस्वालचे कसोटीतील दुसरे शतक ठरले. जयस्वालने शतक पूर्ण करताना मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

जयस्वालच्या या शतकामुळे भारताने सहज 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

दुसरे कसोटी शतक

जयस्वाल वयाच्या 22 वर्षापर्यंत कसोटीत 2 शतके करणारा सुनील गावसकर यांच्यानंतरचा भारताचा दुसराच सलामीवीर आहे. गावसकर यांनी वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत कसोटीत सलामीला खेळताना 4 शतके केली होती.

दरम्यान, जयस्वालचा हा कारकिर्दीतील सहावाच कसोटी सामना आहे. त्याने गेल्यावर्षी जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने त्यावेळी 171 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT