Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final साठी भारताचे 15 नाही, तर 19 खेळाडू जाणार लंडनला, 'या' चार बॉलरची नावे चर्चेत

कसोटी चॅम्पियनशीप फायनल खेळण्यासाठी 15 खेळाडूंचीच टीम इंडियात निवड झाली असली, तरी एकूण 19 खेळाडू इंग्लंडला जाणार असल्याची चर्चा आहे.

Pranali Kodre

WTC Final: मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जूनमध्ये होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात अजिंक्य रहाणेचे वर्षभरानंतर पुनरागमन झाले आहे. मात्र, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी कसोटी संघातील जागा गमावली आहे. याव्यतिरिक्त मोठे बदल भारताच्या संघात झालेले नाहीत.

दरम्यान, अंतिम सामना खेळण्यासाठी जरी 15 खेळाडूंचीच निवड झाली असली तरी एकूण 19 खेळाडू इंग्लंडला जाणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संघात निवड झालेले 15 खेळाडू आणि 4 नेट गोलंदाज यांचा समावेश असणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप सेन आणि नवदीप सैनी हे चार गोलंदाज देखील नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाबरोबर लंडनला जाऊ शकतात. या चौघांचीही गेल्या काही काळातील आणि आयपीएल 2023 मधील गोलंदाजी चांगली झाली आहे.

लंडनला होणार अंतिम सामना

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. तसेच 12 जून हा राखीव दिवसही असणार आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार असून लंडन मधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्याने त्यांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या-वहिल्या कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळला होता. त्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

असा आहे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

SCROLL FOR NEXT