Cameron Green Catch Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Catch Controversy: आऊट की नॉटआऊट, ग्रीनने घेतलेल्या गिलच्या कॅचवर चर्चेला उधाण, पण ICC म्हणतेय...

ग्रीनने घेतलेल्या शुभमन गिलच्या वादग्रस्त झेलबद्दल आयसीसीने स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Catch Controversy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून सुरु झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत शुभमन गिलच्या विकेटवरून बराच वाद झाला आहे. द ओव्हलवर सुरु असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात गिलच्या झेलाची बरीच चर्चा झाली. याबद्दल आता आयसीसीनेच स्पष्टीकरण दिले आहे.

झाले असे की ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. पण 8 व्या षटकात स्कॉट बोलंडने गिलला 18 धावांवर बाद केले. त्याचा कॅमेरॉन ग्रीनने गलीच्या क्षेत्रात झेल घेतला.

पण हा झेल ग्रीनने चेंडू खूप खाली झेलला होता. त्यामुळे चेंडू जमीनीवर लागला आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण तिसऱ्या पंच रिचर्ड केटलबोरो यांनी गिलला बाद दिल्याने त्याला माघारी परतावे लागले.

दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 'झेल पकडताना ग्रीनची बोटं चेंडूच्या खाली होती, पण गिल आणि त्याचा सलामीवीर साथीदार रोहित शर्मा यांना वाटले की झेल घेताना जमीनीचाही चेंडूला स्पर्श झाला आहे.

त्यानंतर दीर्घकाळाच्या चर्चेनंतर आणि वेगवेगळ्या अँगल्स आणि रिप्लेमध्ये तपासल्यानंतर झेल देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वैतागलेल्या गिलला मैदानातून बाहेर जावे लागले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा निर्णय देताना सॉफ्ट सिग्नलचा वापर करण्यात आला नव्हता. सॉफ्ट सिग्नलचा नियम १ जूनपासून काढून टाकण्यात आला आहे.

हा नियम मे महिन्यात बदलण्यात आला होता, त्यावेळी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने प्लेइंग कंडिशन्सवर पुन्हा विचार केल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.

त्यावेळी क्रिकेट समितीने सांगितल्यानुसार 'कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मैदानावरील पंच टीव्ही पंचांशी सल्लामसलत करतील. गेल्या काही वर्षांमधील क्रिकेट समितीच्या मागील बैठकांमध्ये सॉफ्ट सिग्नलवर चर्चा झाली आहे.'

'समितीने यावर सखोल विचार केला आणि असा निष्कर्ष काढला की सॉफ्ट सिग्नल अनावश्यक आणि काही वेळा गोंधळात टाकणारे होते. कारण झेलचे संदर्भ अनेकदा रिप्लेमध्ये अनिर्णित दिसतात.'

दरम्यान आयसीसीने सांगितल्या प्रमाणे एमसीसी क्रिकेट नियमातील कलम 33.3 नुसार चेंडू पहिल्यांदा क्षेत्ररक्षकाच्या संपर्कात येण्यापासून ते क्षेत्ररक्षक चेंडू आणि स्वत:वर पूर्ण नियंत्रण मिळवण्यापर्यंतच्या प्रक्रियेनंतर झेल पूर्ण तेव्हा समजला जातो.

गिलने दिली प्रतिक्रिया

ग्रीनने घेतलेल्या गिलच्या झेलावर क्रिकेट वर्तुळातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही या झेलाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच स्वत: गिलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ग्रीन झेल घेत असतानाचा फोटो शेअर करताना भिंगाचे इमोजी कॅप्शनमध्ये टाकले आहेत.

सामना रोमांचक वळणावर

या अंतिम सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने 444 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात 3 बाद 164 धावा केल्या आहेत. अद्याप भारताला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज आहे.

चौथ्या दिवशी भारताकडून विराट कोहली 44 धावांवर आणि अजिंक्य राहणे 20 धावांवर नाबाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT