ICC Tournament: टी20 वर्ल्डकप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे ठिकाण बदलणार? 'या' ठिकाणी होऊ शकतात स्पर्धा

टी20 वर्ल्डकप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धांचे ठिकाण बदलले जाऊ शकते.
T20 World Cup
T20 World Cup Dainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2024 and Champions Trophy 2025 Venues may change: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केलेल्या वेळापत्रकानुसार जवळपास 2030 पर्यंत दरवर्षी एखादीतरी आयसीसी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. पण आता असे समोर येत आहे की 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे ठिकाण बदलले जाऊ शकते.

सध्याच्या वेळापत्रकानुसार 2024 टी20 वर्ल्डकपचे आयोजनाचे हक्क कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेकडे आहेत. तसेच 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हक्क पाकिस्तानकडे आहेत.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार असे समोर येत आहे की पाकिस्तान आयोजक असलेली 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2024 टी20 वर्ल्डकपची भरपाई म्हणून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाऊ शकते. तसेच त्या बदल्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अर्थिक नुकसान भरपाई दिली जाऊ शकते.

T20 World Cup
Team India Video: WTC फायनलपूर्वी भारतीय खेळाडूंची मस्ती! ICC ने शेअर केला 'बिहाइंड द सीन' व्हिडिओ

तसेच अशीही माहिती मिळाली आहे की सध्या क्रिकेट बोर्ड, आयसीसी आणि भागधारक यांच्यात तोंडी चर्चा होत आहे. पण या प्रत्सावासाठी आयसीसीच्या आगामी स्पर्धांचे प्रसारक सहमत असल्याचे समजत आहे.

याशिवाय न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतून इंग्लंडमध्ये 2024 टी20 वर्ल्डकप हलवला जाऊ शकतो. कारण जूनमध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेटसाठी योग्य परिस्थितीत समजली जाते.

तसेच 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत हलवण्यामागे कारण असे की ही स्पर्धा अन्य स्पर्धांपेक्षा लहान असते. त्यामुळे प्रसारकांची अर्थिक जोखीम कमी होते. त्याचबरोबर कमी पायाभूत सुविधांची गरज असते.

T20 World Cup
WTC 2023 Final मध्ये पावसापेक्षाही 'या' गोष्टीचं ICC ला टेंशन, स्टेडियममध्ये तयार ठेवल्या दोन खेळपट्ट्या

एका सुत्राने याबद्दल माहिती दिली आहे की 'अमेरिकेतील सध्याच्या सुविधा फारशा चांगल्या नाहीत. जरी तिथे मेजर लीग क्रिकेट ही स्पर्धा आयोजित केलेली असली, तरी टी20 वर्ल्डकपसारख्या स्पर्धा आयोजित करणे वेगळी गोष्ट असते. त्यामुळे जर ठिकाणे पूर्ण तयार नसतील, तर तुम्ही सामने कसे आयोजित करणार? तसेच दिर्घकाळ चालणारी स्पर्धा उपखंडाच्या तुलनेत तिथे प्रसारकांसाठी तोट्याची ठरु शकते. उपखंडात मिळणारा मोबदला अधिक असतो.'

साल 2007 मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेला वनडे वर्ल्डकपमध्ये मोठे अर्थिक नुकसान झाले होते. त्यातच भारतीय संघ लवकर बाहेर पडल्याने त्याचा परिणाम अधिक झाला. आता जवळपास 16 वर्षांनंतर प्रसारकांची इच्छा आहे की सामन्यांच्या वेळा शक्य तेवढ्या भारतीय वेळेनुसार ठेवण्यात याव्यात.

दरम्यान 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजिक करण्यामुळे तिथे सुविधा वाढण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तसेच टी20 वर्ल्डकपपेक्षा कमी सामने असल्याने त्याचाही फायदा होऊ शकतो. यापूर्वी 2017 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा बर्मिंगहॅम, द ओव्हल आणि कार्डिफ या तीनच ठिकाणी खेळवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com