WTC 2023 Final: "विराट आला अन् थेट स्मिथला तोंडावर म्हणाला, खराब शॉट खेळला..."

Video: कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये विराटने स्मिथने थेट खराब शॉट खेळल्याचे तोंडावर सांगितले.
Virat Kohli | Steve Smith
Virat Kohli | Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

Hilarious banter between Steve Smith and Virat Kohli: बुधवारपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सध्या ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे. दरम्यान, या सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांच्यात मजेशीर संवाद झाला होता, ज्याचा खुलासा जस्टिन लँगरने केला.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात तो 34 धावा करूनच बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने बाद केले. स्मिथने फ्रंट फुटवर येत फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि शार्दुल ठाकूरकडे सोपा झेल दिला. या झेलनंतर स्मिथही निराश झाला होता. दरम्यान, स्मिथच्या या फटक्याबद्दल विराटनेही त्याला जाणीव करून दिली.

Virat Kohli | Steve Smith
Virat Kohli Post: विराटचं सोशल मीडिया ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर? 'त्या' पोस्टने चर्चेला उधाण

याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक लँगरने चौथ्या दिवशी समालोचन करताना सांगितले. त्याने सांगितले की "आज सकाळी मी स्टीव्ह स्मिथशी चर्चा करत होतो. त्यावेळी विराट कोहली त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, 'खराब शॉट'"

"त्यावेळी स्मिथ... जर जगातील अन्य कोणी येऊन त्याला सांगितले, तर स्मिथ म्हटला असता 'काहीही असो' असे म्हटला असता. पण विराटने येऊन त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, 'हम्म... हा, बरोबर आहे.'"

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास चौथ्या दिवसाचे पहिले सत्र संपले, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 70 षटकात 6 बाद 201 धावा केल्या आहेत. कॅरी 41 धावांवर आणि स्टार्क 11 धावांवर नाबाद आहे. तसेच ऑस्ट्रेलिया पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे 374 धावांनी पुढे आहे.

Virat Kohli | Steve Smith
Ravi Shastri on Virat Kohli: ... तर विराट ठरू शकतो धोकादायक, शास्त्रींचा WTC फायनलपूर्वी कांगारूंना इशारा

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com