8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

Central Government Employees: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
8th Pay Commission
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2025 मध्ये जाहीर केलेल्या 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून तांत्रिकदृष्ट्या सुरु झाली असली, तरी प्रत्यक्ष वेतनवाढीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. भारतात दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याची परंपरा असून 2016 मध्ये लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाची जागा आता हा नवीन आयोग घेणार आहे.

या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, पेन्शन आणि महागाई भत्ता (DA) यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. सध्या या आयोगाचे कामकाज वेगात सुरु असून अर्थ मंत्रालयाने या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणण्यासाठी कर्मचारी संघटना, पेन्शनधारक यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत.

या सूचना नोंदवण्यासाठी सरकारने एक ऑनलाइन पोर्टल सुरु केले असून, हे पोर्टल 30 एप्रिल 2026 पर्यंत खुले राहणार आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या आणि सूचना याद्वारे सरकारपर्यंत पोहोचवता येतील. विशेष म्हणजे, 8व्या वेतन आयोगाला आपला सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या अहवालानंतरच प्रत्यक्ष वेतनश्रेणी आणि भत्त्यांची नवी रचना स्पष्ट होणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होऊन ते 18,000 रुपयांवर पोहोचले होते, तर कमाल वेतन 2.5 लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. आता 10 वर्षांनंतरच्या महागाईचा (Inflation) विचार करता, 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

8th Pay Commission
8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

वेतनवाढीचे संपूर्ण गणित हे 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर हा तो आकडा असतो ज्याने तुमच्या मूळ वेतनाला गुणले जाते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, 8व्या वेतन आयोगामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सरकारने 3.0 चा फिटमेंट फॅक्टर मान्य केला, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 20 ते 35 टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ होऊ शकते. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. वेतनवाढीचा हा निर्णय केवळ फिटमेंट फॅक्टरवरच नाही, तर देशातील सध्याची महागाई, सरकारची आर्थिक क्षमता, कररचना आणि मागील आयोगांच्या शिफारसी यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

केंद्र सरकारला या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे तिजोरीवर पडणारा बोजा आणि कर्मचाऱ्यांचे समाधान यांचा समतोल साधावा लागणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत आपल्या सूचना नोंदवणे महत्त्वाचे आहे, कारण या सूचनांचा विचार अहवाल तयार करताना केला जाईल. प्रत्यक्ष पगारवाढ हाती येण्यास थोडा वेळ लागणार असला, तरी 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला आलेली गती पाहता, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Employees) आगामी काळ आर्थिकदृष्ट्या सुखावह ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com