WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final Video: अर्रर्रर्र! रहाणेकडून सुटला हेडचा कठीण कॅच, रोहित-शमीची रिऍक्शनही व्हायरल

Video: कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक पूर्ण करण्यापूर्वीच हेडचा कॅच घेण्याची रहाणेकडे संधी आली होती, पण ही संधी हुकली.

Pranali Kodre

WTC 2023 Final, Ajinkya Rahane missed catch of Travis Head: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हलवर होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड 146 धावांवर नाबाद राहिला, तर स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी पहिल्या दिवसाखेरपर्यंत 251 धावांची नाबाद भागीदारी केली. विशेष म्हणजे भारताने 76 धावांवरच ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. पण त्यानंतर स्मिथ आणि हेडने ऑस्ट्रेलियाला सावरत भक्कम स्थितीत उभे केले.

दरम्यान, भारताकडे हेड 71 धावांवर असताना त्याला बाद करण्याची संधी होती. मात्र, ही संधी थोडक्यात हुकली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 3 बाद 185 धावांवर होता. झाले असे की 57 व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवर हेडने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या जोरदार शॉटवर चेंडू वेगाने गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या अजिंक्य रहाणेच्या डोक्यावरून गेला. त्यावेळी रहाणेने चेंडू पकडण्याचा कठीण प्रयत्न केला, पण चेंडू इतका वेगात गेला, की त्याला प्रतिक्रियेसाठी वेळ मिळाला नाही.

पण हा चेंडू झेलण्याची ही कठीण संधी होती. पण जेव्हा ही संधी सुटली, तेव्हा रोहित शर्मा आणि शमी हे देखील चकीत झाले होते. या चेंडूचा व्हिडिओ आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

यानंतर मात्र हेड आणि स्मिथने पुन्हा भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. हेडने केवळ 106 चेंडूत शतकी खेळी केली. त्यामुळे तो कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडूही ठरला. तसेच त्याला साथ देताना नंतर स्मिथनेही अर्धशतक केले.

आता दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच स्मिथला शतकाची आणि हेडला द्विशतकाची संधी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: 27 विरुद्ध 7! 'गोवा नोंदणी सुधारणा विधेयक' विधानसभेत बहुमताने मंजूर; सरकारनं विरोधकांची मागणी फेटाळली

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सरकारचा फायनल निर्णय नाही

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

SCROLL FOR NEXT