WTC final 2023 India vs Australia Dainik Gomatak
क्रीडा

WTC 2023 Final: रोहित शर्माने जिंकला टॉस; अश्विन नाही, जडेजाला संधी, पाहा भारत - ऑस्ट्रेलियाची Playing XI

बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होत आहे.

Pranali Kodre

WTC 2023 Final, India vs Australia, Playing XI: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होत आहे. इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाज असे संमिश्रण करण्यात आले आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. तसेच अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला मात्र या सामन्यासाठी संधी मिळालेली नाही.

याबद्दल रोहितने सांगितले की आर अश्विन सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवणे कठीण असते. तो अनेकवर्षे संघासाठी मॅचविनर खेळाडू ठरला आहे. पण परिस्थितीनुसार असे कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्याचबरोबर या सामन्यातून अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे. रहाणे जवळपास १८ महिन्यांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्कॉट बोलंडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. ऑस्ट्रलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाने बोलंडला खेळवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2019-21 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे पहिले पर्व खेळवण्यात आले होते, त्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

तसेच ऑस्ट्रेलियाची मात्र कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT