WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final, IND vs AUS: तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया 296 धावांनी आघाडीवर, पण स्मिथ-हेडचा अडथळा दूर

Pranali Kodre

WTC 2023 Final, India vs Australia Day 3 Report: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामना सुरू आहे. द ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 षटकात 4 बाद 123 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या दिवसाखेर मार्नस लॅब्युशेन 41 धावांवर खेळत आहे, तर कॅमेरॉन ग्रीन 7 धावांवर नाबाद आहे. तसेच पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया 296 धावांनी पुढे आहे.

तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 296 धावांवर संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीवा चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केलेला. पण मोहम्मद सिराजन चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरला चकवले. त्यामुळे वॉर्नर केवळ 1 धाव काढून माघारी परतला.

त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्युशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची भागीदारी रंगतही होती. पण 15 व्या षटकात ख्वाजाला उमेश यादवने माघारी धाडले. ख्वाजा 13 धावांवर बाद झाला.

यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथने मार्नस लॅब्युशेनची चांगली साथ दिली. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. पण त्यांची तिसऱ्या विकेटसाठीची 62 धावांची भागीदारी रविंद्र जडेजाने 31 व्या षटकात मोडली. त्याने स्मिथला ३४ धावांवर बाद केले. त्याचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला.

त्यानंतर जडेजाने ट्रेविस हेडलाही 18 धावांवर 37 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडत माघारी पाठवले. त्यानंतर मात्र, ग्रीन आणि लॅब्युशेनने भारतीय गोलंदाजांना फार यश मिळू दिले नाही.

तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

तत्पुर्वी, तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 38 षटके आणि 5 बाद 151 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतने 5 धावांवर विकेट गमावली. त्याला स्कॉट बोलंडने 39 व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्यावेळी 152 धावांवर 6 विकेट्स, अशी भारताची अवस्था होती.

पण त्यानंतर रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी भारताचा डाव सावरताना 109 धावांची भागीदारी केली. पण ही धोकादायक ठरणारी भागीदारी कमिन्सने दुसऱ्या सत्रातच्या सुरुवातीला डावाच्या 62 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तोडली. त्याने टाकलेल्या अखुड टप्प्याच्या चेंडूवर रहाणेने शॉट खेळण्याच्या प्रयत्नात 129 चेंडूत 89 धावांवर झेलबाद झाला. राहणेचा झेल गलीच्या क्षेत्रात कॅमेरॉन ग्रीनने सूर मारत घेतला.

पण यानंतरही शार्दुलने आपली लय कायम ठेवली होती. त्याने उमेश यादवबरोबर फलंदाजी करताना डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 66 व्या षटकात उमेशला 5 धावांवर कमिन्सनेच त्रिफळाचीत केले.

दरम्यान नंतर शार्दुलने अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर 69 व्या षटकात त्याला कॅमेरॉन ग्रीनने चूक करण्यास भाग पाडले. शार्दुलने ग्रीनच्या चेंडूवर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण तो यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीकडे झेल देत बाद झाला. त्याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

यानंतर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 11 चेंडूत 13 धावा करणाऱ्या मोहम्मद शमीला 70 व्या सामन्यात मिचेल स्टार्कने कॅरीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT