WTC 2023 Final: रहाणेनं 512 दिवसांनी कमबॅकच केलं नाही, तर 'हा' रेकॉर्डही केला नावावर; धोनीलाही टाकलं मागे

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळताना रहाणेने कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya Rahane Dainik Gomantak

Ajinkya Rahane 5000 test Runs: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून द ओव्हल मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारताकडून अजिंक्य रहाणेने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने वरच्या फळीतील विकेट्स झटपट गमावल्यानंतर अजिंक्य राहणेने आधी रविंद्र जडेजा आणि नंतर शार्दुल ठाकूरला साथीला घेत डाव सावरला. यादरम्यान, त्याने त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे.

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane Team India Comeback: 'जेव्हा वगळण्यात आले...' टीम इंडियातील कमबॅकबद्दल बोलताना रहाणे झाला इमोशनल

रहाणेने त्याच्या कारकिर्दीतील 83 व्या कसोटी सामन्यात खेळताना 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा भारताचा 13 वा खेळाडू ठरला आहे. त्याने सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनी या यादीत 14 व्या क्रमांकावर असून त्याने 4876 धावा केल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिक धावा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. सचिनने 15921 धावा केल्या आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात 469 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता. पण भारताने 50 धावांतच 3 विकेट्स गमावल्या. त्यावेळी रहाणे फलंदाजीसाठी उतरला होता. त्यानंतर भारताने चौथी विकेटही लवकर गमावली.

Ajinkya Rahane
Rahul Dravid on Ajinkya Rahane: 'कोणत्याही दगडावर लिहिलेलं नाही की...' रहाणेच्या पुनरागमनावर कोच द्रविडची मोठे भाष्य

पण त्यानंतर रहाणेने रविंद्र जडेजाबरोबर 71 धावांची भागीदारी केली. तसेच नंतर जडेजा आणि श्रीकर भरत बाद झाल्यानंतर रहाणेने शार्दुल ठाकूरबरोबर सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

रहाणेने 92 चेंडूत षटकार ठोकत त्याचे 26 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर 60 षटकात 6 बाद 260 धावा केल्या होत्या. त्यावेळी रहाणे 89 धावांवर आणि शार्दुल 36 धावांवर खेळत होता.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातून तब्बल 512 दिवसांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते. तो अखेरचा सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com