Steve Smith | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

Steve Smith Century: स्मिथने भारताला शतकी दणका देत एक-दोन नाही तब्बल 5 मोठ्या विक्रमांना घातलीये गवसणी, एकदा पाहाच

WTC 2023 Final: स्टीव्ह स्मिथने कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये शानदार शतकी खेळी करत सर डॉन ब्रॅडमन, पाँटिंग, तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

WTC 2023 Final, Steve Smith 5 records: बुधवारपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने काही मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

द ओव्हलवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 121.3 षटकात 469 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली.

दरम्यान, स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक आहे. तसेच त्याचे हे इंग्लंडमधील 7 वे कसोटी शतक आणि भारताविरुद्धचे 9 वे कसोटी शतक ठरले आहे. त्याचबरोबर ओव्हलच्या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे.

त्याने या मैदानावर चौथा कसोटी सामना खेळताना जवळपास 102 च्या सरासरीने 512 धावा (8 जून 2023 पर्यंत) फटकावल्या आहेत. त्याचमुळे वेगवेगळ्या विक्रमांच्या यादीत त्याचे नाव नोंदवले गेले आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके

स्मिथ आता ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये मॅथ्यू हेडनलाही मागे टाकले. हेडनने कसोटी कारकिर्दीत 30 शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर 41 शतकांसह रिकी पाँटिंग आहे. तसेच 32 शतकांसह स्टीव्ह वॉ आहेत. त्यानंतर आता 31 शतकांसह स्मिथ आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारे फलंदाज (8 जून 2023 पर्यंत)

  • 41 - रिकी पाँटिंग

  • 32 - स्टीव्ह वॉ

  • 31 - स्टीव्ह स्मिथ

  • 30 - मॅथ्यू हेडन

  • 29 - सर डॉन ब्रॅडमन

भारताविरुद्ध सर्वात जलद 9 कसोटी शतके

स्मिथ आता भारताविरुद्ध सर्वात जलद 9 कसोटी शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 37 डावातच 9 शतके केली आहेत. यापूर्वी हा विक्रम जो रुटच्या नावावर होता. त्याने 45 डावात भारताविरुद्ध 9 शतके केली होती.

त्याचबरोबर भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करण्याबाबत स्मिथने अव्वल क्रमांकावरील रुटची बरोबरीही केली आहे. आता या दोघांच्याही नावावर भारताविरुद्ध कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी 9 शतकांची नोंद आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके -

  • 9 - जो रुट

  • 9 - स्टीव्ह स्मिथ

  • 8 - रिकी पाँटिंग

  • 8 - सर विव रिचर्ड्स

  • 8 - सर गारफिल्ड सोबर्स

विराट, पाँटिंग, गावसकरांना टाकलं मागे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता स्मिथ 9 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने सुनील गावसकर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे.

गावसकर, पाँटिंग आणि विराट हे तिघेही प्रत्येकी 8 शतकांसह भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (8 जून 2023 पर्यंत) संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 कसोटी सामने खेळताना 11 शतके केली आहेत.

द्रविडला पछाडलं

स्टीव्ह स्मिथने इंग्लंडमध्ये खेळताना सर्वाधिक शतके करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत ७ शतकांसह राहुल द्रविडला मागे टाकले आहे. तसेच स्टीव्ह वॉ यांच्याशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता या विक्रमाच्या यादीत द्रविड आणि वॉ संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

स्टीव्ह वॉ यांनीही इंग्लंडमध्ये ७ कसोटी शतके केली आहेत. द्रविडने इंग्लंडमध्ये ६ कसोटी शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडमध्ये ११ कसोटी शतके केली आहेत.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके करणारे परदेशी खेळाडू

  • 11 - सर डॉन ब्रॅडमन

  • 7 - स्टीव्ह स्मिथ

  • 7 - स्टीव्ह वॉ

  • 6 - राहुल द्रविड

ओव्हलवर स्मिथचा बोलबाला

स्मिथ हा द ओव्हल मैदानात ५०० पेक्षा अधिक कसोटी धावा करणारा डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा दुसराच परदेशी खेळाडू ठरला आहे. ब्रॅडमन यांनी ओव्हलवर ५५३ धावा केल्या आहेत, तसेच स्मिथने ५१२ धावा केल्या आहेत.

द ओव्हलवर सर्वाधिक धावा करणारे परदेशी खेळाडू (7 जून 2023 पर्यंत)

  • 553 - सर डॉन ब्रॅडमन

  • 512 - स्टीव्ह स्मिथ

  • 478 - ऍलेन बॉर्डर

  • 448 - ब्रुस मिचेल

  • 443 - राहुल द्रविड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT