Mirabag: 'मीराबाग बंधाऱ्याचे काम तूर्तास बंद'! मंत्री शिरोडकरांनी दिली माहिती; मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार

Subhash Shirodkar: मीराबाग येथील बंधाऱ्याचे काम पुढील चार ते पाच महिने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
Mirabag
MirabagDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मीराबाग येथील बंधाऱ्याचे काम पुढील चार ते पाच महिने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. हा प्रकल्प सुरू ठेवायचा की रद्द करायचा याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाशी चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच आंदोलन छेडले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी मडगाव येथील लोहिया मैदानावर निदर्शने केली होती. याच दिवशी काही आंदोलकांनी विधानसभा सभागृहातील प्रेक्षक गॅलरीत जाऊन प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली होती.

Mirabag
Mirabag: 'मीराबाग' बंधाऱ्यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता! संगमेश्वर देवस्थान समितीचा विरोध; निवेदन केले सादर

या प्रकारामुळे संतप्त झालेले सभापती गणेश गावकर यांनी संबंधित आंदोलकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अधिवेशनाच्या सात दिवसांच्या कालावधीत विरोधी आमदारांनीही या मुद्द्यावरून सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न केला होता.

Mirabag
Mirabag: '2 दिवसात निर्णय द्या, अन्यथा आंदोलन तीव्र'! मीराबागवासीयांचा निर्धार; प्रेझेंटेशनवेळी पोलिस छावणीचे स्वरूप VIDEO

मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असल्याने मीराबाग येथील बंधाऱ्याचे काम पुढील चार ते पाच महिने बंद ठेवले जाईल, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकल्प पुढे सुरू ठेवायचा की पूर्णपणे रद्द करायचा, असा प्रश्‍‍न पत्रकारांनी उपस्थित केला असता, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षाशी चर्चा करून घेतला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com