एकाच खोलीत बाप-लेकाचा संशयास्पद मृत्यू! डिचोली परिसरात खळबळ; मुलाच्या नाकातोंडातून रक्तस्राव, गूढ वाढले

Bicholim father son death: शहरातील एका भाड्याच्या घरात बाप आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत बापाचे नाव संजय म्हापसेकर असे असून ते डिचोली भाजप मंडळाचे सरचिटणीस होते.
Bicholim father son death
Bicholim father son deathDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : शहरातील एका भाड्याच्या घरात बाप आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत बापाचे नाव संजय म्हापसेकर असे असून ते डिचोली भाजप मंडळाचे सरचिटणीस होते. तर, मृत मुलाचे नाव संचित म्हापसेकर असे असून तो शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकत होता.

नाईकनगर-बोर्डे येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीवजा भाड्याच्या घरात ही घटना घडली. वडिलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र १४ वर्षीय मुलाच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.

मुलाच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याचे आढळल्याने मारहाणीमुळे की विषप्राशनामुळे त्याचा मृत्यू झाला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. घटनास्थळी मुलगा संचित पलंगावर तर वडील संजय पलंगाखाली मृतावस्थेत आढळले, अशी माहिती मिळाली आहे. संजय म्हापसेकर यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते.

घटना घडली त्यावेळी वडील व मुलगा दोघेच घरात होते. त्यांची मुलगी त्यावेळी शहराबाहेर होती. सायंकाळी ती घरी परतल्यानंतर वडील आणि धाकटा भाऊ घरात मृतावस्थेत पडल्‍याचे निदर्शनास येताच तिने हंबरडा फोडला.

Bicholim father son death
रंग खेळताना बसला 'इलेक्ट्रीक शॉक'! होळीच्या उत्साहावर विरजण; झुआरीनगरातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सापडली चिठ्ठी

घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. १०८ रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले; मात्र दोघेही त्याआधीच मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्या चिठ्ठीतील नेमका मजकूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत उघड केला नव्‍हता.

Bicholim father son death
Goa Birth Death Statistics: गोव्यात रोज किती जन्म आणि मृत्यू होतात? आकडेवारी आली समोर; नोंदणीचा तपशीलही उपलब्ध

पोलिस, फॉरेन्सिक पथकाचा तपास

डिचोली पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. तसेच इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही भेट देऊन माहिती घेतली. रात्री उशिरा फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून काही संशयास्पद पुरावे गोळा केले. पोलिसांनी पंचनामा करून बाप-लेकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com