WTC 2023 Final मध्ये टीम इंडियाकडून झाली 'ही' चूक, गावसकरांनी सुनावले खडेबोल

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताकडून एक मोठी चूक झाल्याचे सुनील गावसकरांनी सांगितले आहे.
Sunil Gavaskar | Team India
Sunil Gavaskar | Team IndiaDainik Gomantak

Sunil Gavaskar on Team India: बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने एक मोठी चूक केल्याचे सुनील गावसकरांनी म्हटले आहे.

द ओव्हलवर होत असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवसाखेर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकी गोलंदाज असे संमिश्रण खेळवले आहे. भारताने फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजाला संधी दिली आहे.

त्यामुळे अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला बाहेर बसावे लागले आहे. पण या निर्णयाबद्दल सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापनावर टीका होत आहे. गावसकरांनीही या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

Sunil Gavaskar | Team India
WTC 2023 Final Video: अर्रर्रर्र! रहाणेकडून सुटला हेडचा कठीण कॅच, रोहित-शमीची रिऍक्शनही व्हायरल

गावसकरांनी समालोचन करताना म्हटले की 'जगातील अव्वल क्रमांकाच्या कसोटी गोलंदाजाला एवढ्या मोठ्या सामन्यात बाहेर बसवणे नक्कीच चकीत करणारे होते. परिस्थिती कशीही असली तरी आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील गोलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ नये, ही आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी पात्र होता. त्याच्यामुळे भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचला आहे.'

याशिवाय गावसकरांनी म्हटले आहे की 'मी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विनला संधी न दिल्याने हैराण होतो, कारण त्याने कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मागच्यावेळीही जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केलेला, तेव्हा देखील अश्विनला बाहेर ठेवण्यात आले होते.'

Sunil Gavaskar | Team India
WTC 2023 जिंकायची असेल, तर रोहितसेनेला करावी लागेल 52 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कामगिरीची पुनरावृत्ती

गावसकरांनी असेही म्हटले की चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णयही अयोग्य होता. कारण उमेश आणि शार्दुल आयपीएलमध्ये मागील काही सामने खेळले नव्हते. दोघांनी फारशी चांगली गोलंदाजीही केली नव्हती. तसेच अश्विन आणि जडेजाने त्यांच्या फ्रँचायझीसाठी प्रत्येक सामना खेळला आहे.

गावसकर म्हणाले, 'ऑस्ट्रेलियाच्या संघात सर्वाधिक डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर एक ऑफ स्पिनर खेळवायला पाहिजे होता. मला वाटते की भारताने ही एक चूक केली आहे, ज्याचा परिणाम पहिल्या दिवशी भारताला भोगावा लागला आहे.'

आर अश्विनची शानदार कामगिरी

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलेली आहे. तो कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेतही भारताककडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 61 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाजही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com