Wrestler Pooja Sihag Husband Death Dainik Gomantak
क्रीडा

CWG स्टार कुस्तीपटू पूजावर कोसळला दुःखाचा डोंगर, पती अजय नंदलचा संशयास्पद मृत्यू

पूजाचा पती अजय नंदल हा देखील 2010 पासून कुस्ती खेळत होते. यासोबतच अजय सीआयएसएफमध्येही कार्यरत होता. लग्नानंतरही पूजाने नियमित सराव करणे सोडले नाही.

दैनिक गोमन्तक

Wrestler Pooja Sihag Husband Death: राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू पूजा सिहाग हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजाचा पती अजय नंदल याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अजय नंदलनेही राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत आपला झेंडा रोवला आहे. अजय नंदलचे जवळचे मित्र सोनू आणि रवी या आणखी दोन कुस्तीपटूंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय नंदल हा रोहतकच्या गढी बोहर गावचा रहिवासी होता. सात वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अजयच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पण वृत्तानुसार, अजय आणि त्याचे जवळचे मित्र जाट कॉलेजजवळ कारमध्ये काहीतरी मद्यपान करत असल्याचे सांगण्यात आले.

पूजाने 76 किलो वजनी गटात पदक जिंकले

कुस्तीपटू पूजा सिहागने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाइलच्या 76 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. पूजाने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुयनविरुद्धच्या लढतीत कांस्यपदक जिंकले. त्या सामन्यात पूजा सिहागने तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर नाओमीचा 11-0 असा पराभव केला.

दोघांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते

पूजा सिहागने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले तेव्हा तिच्या सासरच्या घरात आनंदाचे वातावरण होते. तिला सुवर्णपदक मिळेल अशी आशा संपूर्ण कुटुंबाला होती. पुजा मूळची हंसीची असून, पूजाचे अजय नंदलसोबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न झाले होते. पूजाचा पती अजय नंदल हा देखील 2010 पासून कुस्ती खेळत होता. यासोबतच अजय सीआयएसएफमध्येही कार्यरत होता. लग्नानंतरही पूजाने नियमित सराव करणे सोडले नाही.

भारत चौथ्या क्रमांकावर होता

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून चौथे स्थान मिळवले. भारताच्या खात्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके होती. ऑस्ट्रेलियाने 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने 57 सुवर्ण पदकांसह दुसरे तर कॅनडाने 26 सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान मिळविले. न्यूझीलंड 19 सुवर्ण पदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT