CWG 2022: धाकड रेणुका सिंगच्या कामगिरीला मोदींनी लावले चार चाँद, 'शिमल्याची शांतता...'

Renuka Singh: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला.
Renuka Singh
Renuka SinghDainik Gomantak

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, परंतु त्यांनी रौप्य पदक जिंकून भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले.

दरम्यान, भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरचेही महत्त्वाचे योगदान होते. रेणुका या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. तिने पाच सामन्यांमध्ये 5.47 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 11 बळी घेतले. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी चार बळी घेण्याच्या पराक्रमाचाही समावेश आहे. झुलन गोस्वामीनंतर टी-20 मध्ये चार विकेट घेणारी ती दुसरी भारतीय वेगवान गोलंदाज ठरली.

Renuka Singh
CWG 2022 मध्ये 176 पदके जिंकून इंग्लंडने रचला इतिहास, भारताची 5वी सर्वोत्तम कामगिरी

दुसरीकडे, 13 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Prime Minister Narendra Modi) रेणुकाची प्रशंसा करण्यास भाग पाडले. पीएम मोदी म्हणाले की, 'रेणुका सिंगच्या कामगिरीमुळे भारतातील अधिकाधिक तरुण मुलींना क्रिकेटला (Cricket) करिअर म्हणून घेण्यास प्रोत्साहन मिळेल.'

Renuka Singh
CWG 2022: Achanta Sharath Kamal ने टेबल टेनिसमध्ये जिंकले 'सुवर्ण'

पीएम मोदी पुढे म्हणाले, "सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली, परंतु अद्यापही रेणुकाच्या स्विंगला ब्रेक लागलेला नाही. तिच्या चेहऱ्यावर शिमल्याची (Shimla) शांतता असेल, हिमालयाचं निरागस हास्य असेल, परंतु तिची आक्रमकता मोठ मोठ्या फलंदाजांना गारद करते. रेणुकाची कामगिरी दुर्गम भागातील मुलींना नक्कीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com