Bajrang Punia & Vinesh Phogat & Sakshi Malik Dainik Gomantak
क्रीडा

Delhi High Court: कुस्तीपटू बजरंग-विनेशला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, आशियाई क्रीडा स्पर्धेत...

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना मोठा दिलासा दिला आहे.

Manish Jadhav

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना मोठा दिलासा दिला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या ट्रायलमधून देण्यात आलेल्या सूटमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी फोगट आणि पुनिया यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट प्रवेशाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

अंडर-20 विश्वविजेता अन्विल पंघल आणि अंडर-23 आशियाई चॅम्पियन सुजित कलकल यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायाधीश म्हणाले की, "रिट याचिका फेटाळली आहे."

इतर पैलवानांनी विरोध दर्शवला

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या तदर्थ समितीने मंगळवारी विनेशला 53 किलो आणि पुनियाला 65 किलोमध्ये थेट आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश दिला, तर इतर कुस्तीपटूंना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी 22 आणि 23 जुलै रोजी होणाऱ्या ट्रायलमधून जावे लागेल.

पंघल आणि कलकल यांनी 19 जुलै रोजी उच्च न्यायालयात (High Court) या सूटला आव्हान दिले होते. या स्पर्धेसाठी योग्य निवड प्रक्रिया व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

आदेश रद्द करण्याची मागणी

हृषिकेश बरुआ आणि अक्षय कुमार या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत IOA तदर्थ समितीने दोन श्रेणी (पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो आणि महिला 53 किलो) संदर्भात जारी केलेले निर्देश बाजूला ठेवण्याची मागणी केली होती. तसेच फोगट आणि पुनिया यांना दिलेली सूटही रद्द करण्यात यावी. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: गोवा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, विरोधी पक्षाकडून अल्टोन डिकोस्टा रिंगणात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT