Asian Games Trials Exemption: बजरंग-विनेशच्या ट्रायल्सवरून जुंपली 'कुस्ती'! साक्षी मलिक म्हणतेय, 'मी समर्थन करणार नाही, पण...'

Bajrang Punia - Vinesh Phogat: विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना एशियन गेम्सच्या ट्रायल्समधून सुट देण्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
Gomantak Editorial | Wrestlers Protest
Gomantak Editorial | Wrestlers ProtestDainik Gomantak

Sakshi Malik on Bajrang Punia and Vinesh Phogat Asian Games Trials Exemption: भारताचे कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना एशियन गेम्सच्या ट्रायल्समधून सुट देण्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याबद्दल आता साक्षी मलिकनेही प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या काही कुस्तीपटूंनी माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याच्या आरोपावरून आंदोलन केले होते. यानंतर ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते, तसेच त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली.

या आंदोलनात बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या स्टार कुस्तीपटूंचाही समावेश होता. दरम्यान या आंदोलनानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ऍड-हॉक कमिटीने बंजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्सच्या ट्रायल्समधून सुट दिली. यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळल्याचे दिसले.

Gomantak Editorial | Wrestlers Protest
Brij Bhushan Sharan Singh: कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना जामीन मंजूर, दिल्ली पोलिसांनी...

दरम्यान, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार याबद्दल साक्षी मलिकने प्रतिक्रिया देताना म्हटले की 'तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एशियन गेम्स स्पर्धेच्या तयारीसाठी आम्ही सरकारकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. आम्ही आमचे ट्रायल्स 10 ऑगस्टनंतर घेण्याची विनंती केली होती आणि सरकारने आम्हाला वेळही दिला होता. त्यानंतर आम्ही तयारीला सुरुवातही केली.'

'पण, गेल्या ३-४ दिवसांत दोन वजनी गटांसाठी थेट प्रवेश दिल्याचे समोर आले. दरम्यान, मलाही माझ्या नावाचाही विचार केला जाईल, असे ई-मेलद्वारे सांगण्यात आले होते. पण मी नकार दिला. मला मला ट्रायल्सशिवाय जायचे नव्हते.'

'आमचे ट्रायल्स 10 ऑगस्टनंतर घेण्यात याव्यात, यावरच केवळ आम्ही चर्चा केली होती. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि निष्पक्ष निवडीसाठी संधी मिळाली पाहिजे.'

साक्षी महिलांच्या ६२ किलो वजनी गटातून खेळते. तिने यापूर्वी ट्वीट करत सरकारकडून त्यांची एकता तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केला होता.

तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की 'सरकारने एशियन गेम्ससाठी थेट नावे पाठवून कुस्तीपटुंची एकता तोडण्याचे काम केले आहे. मी कधीही ट्रायल्स खेळल्याशिवाय गेलेली नाही आणि याचे समर्थनही करणार नाही. सरकारच्या या हेतूने विचलित झाले आहे. आम्ही केवळ ट्रायल्सची तारिख पुढे ढकण्याबद्दल सांगितले होते, पण सरकारने आमच्या झोळीत बदनामीच टाकली आहे.'

Gomantak Editorial | Wrestlers Protest
Brij Bhushan Sharan Singh : हा तर इमोशनल ड्रामा; ब्रिजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंबद्दल वादग्रस्त विधान

दिल्ली उच्चन्यायालयाने ऍड-हॉक समितीला फटकारले

मंगळवारी ऍड हॉक कमिटीने बंजरंग पुनियाला पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात आणि विनेशला महिलाच्या ५३ किलो वजनी गटातून एशियन गेम्ससाठी थेट प्रवेश दिला. यानंतर अनेक ज्युनियर कुस्तीपटूंनी त्यांच्या पालकांसह आणि प्रशिक्षकांसह भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते.

त्यांनी बजरंग आणि विनेशला थेट प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेतला जावा, यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलकांबरोबर भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त देखील होता.

२० वर्षांखालील वर्ल्डचॅम्पियन अंतिम पंघाल आणि २३ वर्षांखालील एशियन चॅम्पियन सुजित कलकल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ऍड-हॉक कमिटीकडून उत्तर मागितले आहे. यावर २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, एशियन गेम्ससाठी कुस्तीपटूंच्या ट्रायल्स २२ आणि २३ जुलै दरम्यान होणार आहेत.

ब्रिजभूषण यांना जामीन मंजूर

महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना जामीन मिळाला आहे. त्यांना गुरुवारी दिल्लीच्या राऊस ऍव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला.

न्यायालयाने त्यांना जामीन देताना न्यायालयाला कळवल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी अट घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com