Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 Auction: स्मृती मानधनाला लागली 3 कोटींहून अधिकची बोली, 'या' संघात झाली सामील

स्मृती मानधनाला वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामासाठी 3 कोटींहून अधिकची बोली लागली आहे.

Pranali Kodre

WPL 2023 Auction: सोमवारी (13 फेब्रुवारी) वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाचा लिलाव मुंबईत पार पडला. या लिलावात पहिलेच नाव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे आले. तिच्यासाठी अपेक्षेप्रमाणे मोठी मागणी झाली.

तिच्यासाठी सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याच चूरस सुरू होती. या दोन्ही संघांमध्ये तिची किंमत ३ कोटींचा टप्पा पार झाला तरी चढाओढ पाहायला मिळाली. पण अखेर बेंगलोरने 3 कोटी 40 लाखांची बोली मानधनासाठी लावत तिला संघात घेतले. मानधनाची मुळ किंमत 50 लाख रुपये होती.

मानधनाला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. तसेच ती संघाच्या कर्णधारपदासाठीही चांगला पर्याय ठरू शकते. ती सध्याची भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तिच्यावर डब्ल्यूपीएल लिलावात मोठी बोली लागण्याचे अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केले होते. हे अंदाज आता खरे ठरले असून तिचा या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे.

मानधना यापूर्वी परदेशी टी20 लीगमध्येही खेळली असल्याने तिचा अनुभव संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ती परदेशी लीग खेळणाऱ्या सुरुवातीच्या भारतीय खेळाडूंपैकी एक होती. तिने आत्तापर्यंत द हंड्रेडमध्ये साऊदर्न ब्रेव्ह संघाचे, किया सुपर लीगमध्ये वेस्टर्न स्ट्रोम संघाचे, तसेच बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स आणि ब्रिस्बेन हिट या महिला संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

तिने आत्तापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 20 अर्धशकांसह तिने 2651 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT