Women's IPL Teams: महिला आयपीएलची वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा प्रतीक्षा काळ आणखी काहीसा कमी झाला आहे. बुधवारी बीसीसीआयने महिला आयपीएलच्या पहिल्या सत्रासाठी पाच संघांची घोषणा केली आहे. हे पाच संघ अहमदाबाद, मुंबई, बंगळुरु, दिल्ली आणि लखनौ असतील.
या फ्रँचायझी संघांपैकी सर्वात महागडा संघ अहमदाबादचा आहे, जो अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, याला महिला प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, महिला आयपीएल संघांच्या यशस्वी बोली लावणाऱ्यांची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) सांगितले की, पाच संघांची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये आहे. यामध्ये सर्वात महागडा संघ अहमदाबादचा असल्याचे सिद्ध झाले, ज्याला अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने 1289 कोटी रुपयांना विकत घेतले.
1. अहमदाबाद - रु. 1289 कोटी - अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड
2. मुंबई - रु. 912.99 कोटी - इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
3. बंगळुरु - रु. 901 कोटी - रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
4. दिल्ली - रु 810 कोटी - JSW GMR क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड
.5. लखनौ - रु 757 कोटी - कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ट्विट केले की, आजचा दिवस क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीगने पहिल्या पुरुषांच्या IPL 2008 चा विक्रम मोडला. एकूण 4669. 99 ची बोली लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.