India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

India Asian Games Medal Performance: शेवटच्या सुवर्ण पदकाच्या सामन्यामध्ये मात्र आम्ही बऱ्याचदा मात स्वीकारतो. यंदाच्या आशियाई खेळात बॅडमिंटन म्हणा, स्क्वॉश म्हणा, आम्ही मोक्याच्या ठिकाणी मागे पडलो.
India Asian Games Medal Performance
India Asian GamesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

शेवटच्या सुवर्ण पदकाच्या सामन्यामध्ये मात्र आम्ही बऱ्याचदा मात स्वीकारतो. यंदाच्या आशियाई खेळात बॅडमिंटन म्हणा, स्क्वॉश म्हणा, आम्ही मोक्याच्या ठिकाणी मागे पडलो. अति महत्वाचा अंक आम्ही नाही मिळवू शकलो. स्क्वॉशमध्ये अभय सिंग आणि अनाहत सिंग यांनी अंतिम फेरीपर्यंत अचूक खेळ केला, अंतिम फेरीत मात्र प्रतिस्पर्धी वरचढ ठरला.

चालू असलेल्या आशियाई खेळामध्ये परत एकदा भारतात आणि बाकीच्या खेळातल्या दिग्गज देशांमधली तफावत जाणून आली. चीनला शंभर पेक्षा अधिक सुवर्ण पदके मिळाली आणि आम्ही दहापेक्षा कमी सुवर्ण पदके मिळवून पदक तक्त्यात खाली आहोत. आमच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर पेक्षा जास्त वर्षं उलटून सुद्धा आपल्या देशात आमची म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही, सामाजिक सुविधा, रस्ते आणि मूलभूत सुविधा, चांगल्या दर्जाची क्रीडांगणे, ॲथलेटिक्स साठी जागतिक दर्जाचे स्टेडियम, या सगळ्यामध्ये आम्ही अजून मागे पडतोय.

India Asian Games Medal Performance
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

आम्ही अजूनही ऑलिम्पिक आणि आशियाई खेळ सारख्या स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळविण्यात अपयशी ठरतो आहोत. अनेक खेळांमध्ये कुशल खेळाडू भारतात तयार झाले आहेत, अनेक स्पर्धामध्ये विश्वविजयी कामगिरी करणारे खेळाडू सुद्धा आपल्या देशात आहेत. शेवटच्या सुवर्ण पदकाच्या मॅच मध्ये मात्र आम्ही बऱ्याचवेळा मात स्वीकारतो.

यंदाच्या आशियाई खेळात बॅडमिंटन म्हणा, स्क्वॉश म्हणा, आम्ही मोक्याच्या ठिकाणी मागे पडलो. अति महत्वाचा अंक आम्ही नाही मिळवू शकलो. स्क्वॉश मध्ये अभय सिंग आणी अनाहत सिंग यांनी अंतिम फेरी पर्यंत अचूक खेळ केला, अंतिम फेरीत मात्र प्रतिस्पर्धी वरचढ ठरला. आमच्या देशात जागतिक क्रमवारीत अत्युच्च असे खेळाडू आहेत. लक्ष्य सेन , पी. व्ही. सिंधू , शेट्टी-रांकेरेड्डी या सारखे जगज्जेते खेळाडू आहेत. पण त्यांना सुद्धा क्रमवारीत कमी असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला. या सगळ्यात खेळाबरोबरच मानसिक कणखरता कशी सुधारावी ह्याचं प्रशिक्षण सुद्धा सुधारावं लागेल.

देशभर खेळामध्ये रुची वाढलेली आहे, प्रशिक्षक आपल्या परीने खेळाडू तयार करताहेत, स्टेडियमची निर्मिती होत आहे पण जितक्या गतीने आम्हाला खेळात प्रगती साधण्याची आशा होती तितक्या गतीने आम्हाला परिणाम दिसत नाहीत. पदक तक्त्यामध्ये छोटे देश आम्हाला मागे टाकतायत. चीन , कोरिया , जपान या आशियाई देशांशी आम्ही आपली अजून तुलना करू शकत नाही.

India Asian Games Medal Performance
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

या सगळ्या देशामध्ये जी खेळ संस्कृती तयार झालेली आहे त्याचा आम्ही अजून आपल्या देशात विचार करू शकत नाही. आमच्या मोदी सरकारने देशाला ऑलिम्पिक पदकसंख्या वाढवण्याचं एक महत्वाकांक्षी आवाहन केलं आहे पण हे स्वप्न सत्यात उतरवायला एक मिशन मोड मध्ये काम करण्याची गरज आहे. शाळा-शाळांमध्ये, गावा-गावांत खेळांची रुची वाढवायचा प्रयत्न मुलांमध्ये लहान वयातच व्हायला हवा. खेळाच्या सुविधा अनेकपटीने वाढायला हव्यात. खेळांच्या प्राधिकरणांमध्ये राजकारण सोडून झोकून देण्याची वृत्ती रुजवायला हवी.

आमचे खेळाडू मनाने कणखर कसे बनतील ह्याचा विचार व्हायला हवा. आमचे स्टेडियम फक्त खेळांसाठीच कसे वापरावे ह्याचा परिणामकारक विचार व्हायला हवा. सध्या देशात जे चांगले खेळाडू आहेत ते आपल्या मेहनतीने आणि खूप उदाहरणांमध्ये स्वखर्चाने तयार झाले आहेत , त्यांच्या आई वडिलानी खूप कष्ट सोसून आणि वैयक्तिक त्याग करून या मुलाना खेळत तयार केलेलं आहे .

ही सगळी परिस्थिती आता बदलायला हवी. एवढी वर्ष भारतात फक्त क्रिकेटला प्राधान्य दिलं जायचं-ती परिस्थिती बदलून लोक थोडंफार दुसऱ्या खेळात रुची दाखवू लागले आहेत. सध्याचे आमचे प्रयत्न अजूनही खूप अपुरे आहेत. आणखी एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आम्ही खूप अश्या वैयक्तिक खेळामध्ये जास्त लक्ष देत नाहीत . ऑलिम्पिक आणि आशियाई खेळामध्ये जास्त पदकं धावणे , लांब उडी, उंच उडी, ॲथलेटिक्स सारख्या वैयक्तिक प्रकारात असतात. सांघिक खेळ प्रकारामध्ये कमी पदके असतात.

क्रिकेट, कबड्डी, हॉकी हे सगळे क्रीडाप्रकार आम्हाला फक्त एक -एक पदकच देऊ शकतात. आम्ही जर चांगले धावपटू आणि ॲथलेटिक्स मधले खेळाडू तयार करू शकलो तर आम्ही जास्त पदकं मिळवू शकू. आमच्या क्रीडा सुविधा आंतर्राष्ट्रीय दर्जाच्या बनवल्या पाहिजेत. गेल्या काही वर्षांत काही सुधारणा झाल्या आहेत पण सर्वसाधारणपणे ह्या खूप कमी आहेत.

India Asian Games Medal Performance
Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

आपल्या गोव्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे नावेली, फातोर्डा, पेडे, कांपाल सारखे इनडोअर स्टेडियम आहेत. हे खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत का, हे आम्हाला तपासून पाहावे लागेल, त्यात असलेल्या प्रकाश व्यवस्था, वातानुकूलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे आहेत का हे तपासून पाहावं लागेल आणि शक्य तिथे अजून चांगल्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. या ठिकाणी चांगले प्रशिक्षक ठेवून मुलांना खेळात तरबेज करून तयार करावं लागेल.

आपल्या राज्याच्या शाळांमध्ये सगळ्या प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षक तयार करावे लागतील. या सगळ्या मध्ये खूप खर्च , वेळ आणि मेहनत घालावी लागेल तरच खेळातील आमच्या राज्याचं आणि देशाचं नाव वर जाऊ शकेल. आम्हा सगळ्यांनाच खोल विचार करून त्या दृष्टीने पावले उचलावी लागतील नाहीतर आणखी काही दशके तरी पदक तक्त्यात भारताचं नाव काही वर येऊ शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com