RCB vs DL Dainik Gomantak
क्रीडा

WPL Final 2026 : वडोदऱ्यात रंगणार आरसीबी अन् दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फायनलचा थरार; कधी होणार टॉस अन् कुठे पाहता येणार फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग?

WPL 2026 Final, RCB vs DL: वुमेन्स प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून जेतेपदासाठी दोन दिग्गज संघ समोरासमोर ठाकले आहेत.

Manish Jadhav

WPL Final 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून जेतेपदासाठी दोन दिग्गज संघ समोरासमोर ठाकले आहेत. या हंगामात साखळी फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने एलिमिनेटर लढतीत गुजरात जाएंट्सचा 7 गडी राखून धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. आता 5 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियम, कोटाम्बी येथे आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.

हा हाय-व्होल्टेज सामना 5 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल, तर 7 वाजता टॉस होणार आहे. टीव्हीवर या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर घेता येईल, तर मोबाईलवर 'जिओ हॉटस्टार' ॲपद्वारे या लढतीचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल मोठी उत्सुकता असून वडोदऱ्याचे मैदान या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहे.

दोन्ही संघांच्या 'हेड टू हेड' आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड दिसते. डब्ल्यूपीएलच्या चार हंगामात या दोन संघात आतापर्यंत 9 वेळा आमनासामना झाला असून, त्यात दिल्लीने 6 वेळा बाजी मारली आहे, तर आरसीबीला केवळ 3 वेळा विजय मिळवता आला आहे. यंदाच्या मोसमातील साखळी फेरीत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 1-1 असा विजय मिळवला असल्याने अंतिम सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल.

या अंतिम सामन्यात वैयक्तिक विक्रमांचीही झुंज पाहायला मिळणार आहे. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाकडे 'ऑरेंज कॅप' पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या 290 धावांसह ती तिसऱ्या स्थानी असून हरमनप्रीत कौरला (342 धावा) मागे टाकण्यासाठी तिला फायनलमध्ये 53 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये दिल्लीची नंदिनी शर्मा 'पर्पल कॅप'च्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 16 विकेट्स घेणाऱ्या नंदिनीला अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी केवळ 2 विकेट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे जेतेपदासोबतच वैयक्तिक सन्मानासाठीही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT