WPL 2024 RCB vs MI Ellyse Perry Six Wickets Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: ॲलिस पेरीची मुंबईविरुद्ध शानदार गोलंदाजी; डब्ल्यूपीएलमध्ये 6 विकेट्स घेत रचला इतिहास

WPL 2024 RCB vs MI Ellyse Perry Six Wickets: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरु आहे. या हंगामात एकापाठोपाठ एक सामन्यात अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

WPL 2024 RCB vs MI Ellyse Perry Six Wickets: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरु आहे. या हंगामात एकापाठोपाठ एक सामन्यात अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. हंगामाची सुरुवातच अशी झाली की सजीवन सजनाने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला. त्यानंतर दीप्ती शर्माची हॅटट्रिक, हरमनप्रीत कौरची शानदार खेळी, ऋचा घोषचा धडाका, असे अनेक क्षण या हंगामात आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. आता या यादीत स्टार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ॲलिस पेरीही सामील झाली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आजच्या सामन्यात पेरीने आरसीबीसाठी 4 षटकांत 15 धावांत 6 बळी घेत इतिहास रचला.

सर्वात मोठा विक्रम केला

दरम्यान, ॲलिस पेरीने महिला प्रीमियर लीगमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तिने असा पराक्रम केला जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. लीगच्या इतिहासात सहा विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे. तिच्या आधी डब्ल्यूपीएलच्या इतिहासात कोणीही 6 बळी घेतले नाहीत. या डावात ॲलिस पेरीने 4 षटकांचा शानदार स्पेल टाकला आणि अवघ्या 15 धावा देत मुंबईचे 6 विकेट्स घेतल्या. तिने आपल्या सहा विकेट्सपैकी चार खेळाडूंना क्लीन बोल्ड केले. तिने सजीवन सजना, नेट सीव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर, अमेलिया कर, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्राकर यांच्या विकेट्स घेतल्या.

WPL इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज

  • ॲलिस पेरी- 15/6 (RCB vs MI, WPL 2024)

  • मेरीजन कॅप- 15/5 (DC vs GG, WPL 2023)

  • आशा शोभना- 22/5 (RCB vs UPW, WPL 2024)

  • तारा नॉरिस- 29/5 (DC vs RCB, WPL 2023)

  • किम गर्थ- 36/5 (GG vs UPW, WPL 2023)

मुंबई इंडियन्सची वाईट अवसस्था

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कर्णधार स्मृती मानधना हिच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर तिने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी केली. नवी सलामीवीर सजीवन सजना आणि हॅली मॅथ्यूजने मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. यास्तिका भाटियाला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी सलामीवीर म्हणून सजीवन सजना फलंदाजीसाठी आली होती. संघाची पहिली विकेट 43 धावांवर पडली पण त्यानंतर विकेट्सचा सिलसिला सुरु झाला. मुंबई संघाने 92 धावांत 8 विकेट्स गमावल्या. मुंबईचा संघ 19 षटकांत 113 धावा करुन सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT